Saturday, April 20, 2024
घरमानिनीकिचनमध्ये बसून जेवणं योग्य आहे का?

किचनमध्ये बसून जेवणं योग्य आहे का?

Subscribe

पोटाची भूक ही किचनमधून निघालेल्या आस्वादामुळेच पूर्ण होते असे बऱ्याच वेळा म्हटले जाते. त्यामुळे आपल्याला भूक लागते तेव्हा आपले पाय आपोआपच किचनच्या दिशेने वळू लागतात. परंतु तुम्हाला जेवताना कधी आपण किचन मध्ये बसून जेवणं करु शकतो का असा प्रश्न कधी पडलाय का? असे करणे खरंच योग्य आहे की अयोग्य? याचेच उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.

जेवणासंबंधित काही नियम
ज्योतिषशास्रात जेवणासंबंधित काही नियम तयार करण्यात आले आहेत. जसे की, जेवणं नेहमी स्वच्छ मनाने खाल्ले पाहिजे. जेवणापूर्वी मंत्रोच्चारण जरुर करावे. त्याचसोबत जेवणाआधी नेहमीच आपले हातपाय स्वच्छ धुवावेत.

- Advertisement -

तज्ञ काय म्हणतात?
काही नियम आपण जेवण करताना नेहमीच लक्षात ठेवतो, जेणेकरुन त्याचा सकारात्मक प्रभाव पडू शकतो. अशातच तज्ञ या बद्दल काय म्हणतात हेच जाणून घेऊयात.

- Advertisement -

-याआधी सुद्धा लोक किचनमध्ये बसूनच जेवण जेवायचे. खरंतर ज्योतिषात याचे फार अधिक महत्व आहे. याचा संबंध थेट राहु ग्रहाशी असल्याचे मानले जाते. यामुळे राहु ग्रह प्रसन्न राहतो आणि शरिर ही तंदुरस्त राहते.

-परंतु जर राहु तुमच्यावर प्रसन्न नसेल तर याचा थेट प्रभाव तुमच्या आरोग्यावर आणि आयुष्यावर होतो. या ग्रहाला शांत करण्यासाठी आणि आनंदित ठेवण्यासाठी स्वयंपाक घरात बसून जेवणं करण्याचा सल्ला दिला जातो.

-ज्योतिष असा सल्ला देतात की, परिवारातील मतदेभद दूर करण्यासाठी सुद्धा सर्व लोकांनी एकत्रित जेवण करण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही किचनमध्ये बसून जेवणं करत असाल तर ते तुमच्यासाठीच उत्तम असेल.

-जमिनीवर बसून जेवणाचे काही फायदे आहेत. तुम्ही जमीवर बसून जेव्हा जेवता तेव्हा शरिर पृथ्वीच्या थेट संपर्कात येते आणि त्याच्यापासून निघणारे तरंग हे शरिरात प्रवेश करतात. ज्यामुळे शरिराला उर्जा मिळते.

 


हेही वाचा: kitchen Tips : दूध उतू जातंय का ? मग वापरा ‘या’ घरगुती टिप्स

- Advertisment -

Manini