Friday, January 3, 2025
HomeमानिनीWeight Loss : वेट लॉससाठी बेस्ट फूड

Weight Loss : वेट लॉससाठी बेस्ट फूड

Subscribe

वाढते वजन ही आजकाल अनेक जणांची डोकेदुखी ठरत आहे. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी जिम, योगा असे प्रकार केले जातात. पण, धावपळीच्या या रोजच्या रुटीनमध्ये सर्वांनाच हे शक्य होत नाही. अशावेळी घरगुती उपायांनी वेटलॉस करणे शक्य होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला वेटलॉससाठी फायदेशीर ठरतील असे पदार्थ सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनाने वाढलेलं वजन कमी करण्यासाठी नक्कीच फायदा होऊ शकतो. जाणून घेऊयात, वेट लॉससाठी कोणते पदार्थ खायला हवेत,

ग्रीन टी –

- Advertisement -

सकाळी उठल्यावर चहा-कॉफी घेण्याऐवजी ग्रीन टी प्यायची सवय लावावी. ग्रीन टी प्यायलामुळे वाढलेलं वजन कमी होऊ शकते.

पालेभाज्या –

- Advertisement -

पालेभाज्यांमध्ये प्रोटिन्स, कॅल्शियम आणि यासह अनेक पौषकतत्वे आढळतात. तुम्ही वजन कमी करण्यासाठी आहारात पालक, मेथी, मुळा या भाज्यांचे सेवन करू शकता.

दही –

आहारात दह्याचा समावेश करावा. दही सुपरफूड आहे. दह्यामध्ये प्रोबायोटिक घटक वेट लॉससाठी उपयुक्त ठरतात. दह्याच्या सेवनाने वजन कमी होण्यासाठी नक्कीच मदत होते.

बेरीज् –

वेट लॉसच्या डाएटमध्ये बेरीजचा समावेश करावा. तुम्ही बेरीजमध्ये ब्लॅंकबेरीज, ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी खाऊ शकता. बेरीजमधील पोषकतत्वे दिर्घकाळ पोट भरलेले ठेवते, ज्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणात खात नाही.

आवळा –

आवळ्यातील व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत. त्यामुळे वेट लॉस डाएटमध्ये आवळा खाऊ शकता. आवळ्याचे लोणचे, सरबत असे बरेच ऑपश्न आहेत.

तुळस –

वेट लॉस डाएटमध्ये तुळस खाऊ शकता. तुळशीत मिनरल्स, आयर्न, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम, फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. तुळशीत आढळणारी ही पोषकत्तत्वे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

लसूण –

लसूणमध्ये फॉस्फरस, सल्फर, झिंक, पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते. तुम्ही वेट लॉस करण्यासाठी याचे सेवन करू शकता.

टोमॅटो –

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, मिनरल्ससारखे पोषकतत्वे आढळतात, जे वेट लॉससह रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

 

 

 

 

हेही पाहा –


 

- Advertisment -

Manini