Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health 'या' पदार्थांमुळेही बदलतो तुमचा स्लिप पॅटर्न

‘या’ पदार्थांमुळेही बदलतो तुमचा स्लिप पॅटर्न

Subscribe

हेल्दी राहण्यासाठी योग्य आहार आणि पुरेशा प्रमाणात शारीरीक व्यायाम करणे अत्यंत गरजेचे असते. आपल्या सवयी आणि लाइफस्टाइलचा सुद्धा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. या व्यतिरिक्त आपली झोप आपल्याला हेल्दी ठेवण्यास मदत करते. परंतु सध्या बिघडणाऱ्या जीवनशैलीमुले आपला स्लीप पॅटर्न बिघडला जातो. रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याने आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ लाहतो. अशातच हेल्दी आरोग्यासाठी उत्तम झोप गरजेची असते.

परंतु आपल्या काही सवयी आणि डाएटमुळे आपल्या स्लिप पॅटर्नमध्ये बदल होते. अशातच असे कोणते पदार्थ आहेत ज्यामुळे तुमचा स्लिप पॅटर्न बदलला जातो याच बद्दल अधिक जाणून घेऊयात.

- Advertisement -

-रात्री उशिरा जेवणे
काही लोकांना रात्री उशिराने जेवण्याची सवय असते. लेट नाइट डिनर आरोग्यासह स्लीप पॅटर्नसाठी सुद्धा नुकसानदायक असते. काही अभ्यासातून असे समोर आले आहे की रात्री उशिराने जेवल्यास स्लीप पॅटर्नमध्ये अडथळा येऊ शकतो.

-अल्कोहोल
अल्कोहोल आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी हानिकारक असते. डब्लूएचओने सुद्धा सांगितले आहे की, अल्कोहोलचा एक थेंब सुद्धा आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतो. आरोग्यासह आपल्या झोपेवर ही यामुळे परिणाम होतो.

- Advertisement -

-कॅफेन
बहुतांशवेळा आपण खुप कामात व्यस्त राहतो तर त्यावेळी कॅफेनचे सेवन हमखास करतो. मात्र कॅफेनचे अधिक सेवन केल्याने आपले आरोग्य प्रभावित होते. त्याचसोबत झोपेवर ही याचा परिणाम होतो.


हेही वाचा- लहान लहान गोष्टी विसरता, मग असू शकते ‘या’ व्हिटॅमिनची कमतरता

- Advertisment -

Manini