आई होणे ही स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुखद घटना असते. प्रत्येक स्त्रीला आई होण्याचा अनुभव घ्यायचा असतो. पण, काहीवेळा अनेक अडचणी येतात, ज्यामुळे स्त्रीचे आई होण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. अशावेळी फर्टिलिटी क्षमता वाढवण्यासाठी तज्ञांच्या मते आहारात काही पदार्थांचा समावेश करायला हवा. कारण महिलांचा आहार परिपूर्ण नसेल तर फर्टिलिटीवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे आहार महत्त्वाचा आहे. परिपूर्ण आहार आणि पौष्टिक अन्नपदार्थ खाल्ल्यास एकंदर आरोग्य सुधारलेच शिवाय फर्टिलिटी सुधारण्यास मदत होईल. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या पदार्थांनी फर्टिलिटी वाढण्यास मदत होईल.
ड्रायफ्रुट्स –
ड्रायफ्रुट्समध्ये अक्रोड, बदाम, पिस्ता आदींचे सेवन महिलांची फर्टिलिटी वाढवण्यासाठी उत्तम सांगितले जातात. यातील ओमेगा 3 फॅटी-ऍसिड फर्टिलिटीसाठी बेस्ट असते.
बिया –
फर्टिलिटी वाढवण्यासाठी भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया खाव्यात. या बियांमध्ये असलेले झिंक, फॉलिक ऍसिड, सेलेनियमसह आदी गुणधर्मांमुळे एग्ज वाढवण्यास मदत होते.
ऍवाकाडो –
महिलांसाठी ऍवाकाडो हे उत्तम फळ आहे. यातील फॅटी ऍसिड महिलांचे आरोग्य आणि फर्टिलिटी क्षमता वाढवते.
बेरी –
महिलांनी त्यांच्या आहारात स्ट्ऱॉबेरी, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी यांचा समावेश करायला हवा. या फळांतील पोषक घटक फर्टिलिटी क्षमता वाढवतात.
पालेभाज्या –
पालेभाज्यातील व्हिटॅमिन सी, फोलेट, लोह आदी पोषक घटक महिलांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात.
खजूर –
फर्टिलिटी क्षमता वाढवण्यासाठी खजूर महिलांनी खायला हवेत. खजूर दुधात मिसळून खाणे आरोग्याच्यादृष्टीने बेस्ट राहील.
शतावरी –
शतावरी महिलांची फर्टिलिटी क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त असते. तिशीनंतरही महिलांना गर्भवती राहायचे असल्यास शतावरीचे सेवन करावे.
अंडी –
फर्टिलिटी वाढवण्यासाठी अंड्याचे सेवन फायदेशीर ठरेल. अंड्याच्या सेवनामुळे फर्टिलिटी पातळी सुधारते.
हेही पाहा –