Tuesday, February 18, 2025
HomeमानिनीHealth Tips : सकाळी रिकाम्या पोटी हे पदार्थ खाऊ नयेत?

Health Tips : सकाळी रिकाम्या पोटी हे पदार्थ खाऊ नयेत?

Subscribe

बहुतेक लोक सकाळी उठतात आणि चहा-पाणी आणि त्यांच्या आवडीच्या इतर गोष्टी खातात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या आवडीच्या या काही गोष्टी तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर किंवा हानिकारक ठरू शकतात? तर उपाशी पोटी कोणत्या गोष्टी खाऊ नयेत? त्यामध्ये आम्लयुक्त सर्व गोष्टी असतात. उपाशी पोटी आम्लयुक्त काहीही खाल्ल्याने पोटाच्या आतड्यांवर परिणाम होतो आणि संसर्ग होण्याचा धोका असतो.

दही

सकाळी उठल्यावर उपाशीपोटी दही खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. दही मध्ये भरपूर प्रमाणामध्ये लॅक्‍टिक ऍसिड असते. सकाळी उपाशीपोटी दही खाल्ल्याने आपल्या पोटातील आम्लाची पातळी बिघडते. सकाळी उपाशीपोटी दही खाल्ल्याने आपल्या पोटातील जे चांगले बॅक्टेरिया असतात ते मृत पावतात, यामुळे ॲसिडिटी वाढते.

कॉफी

सकाळी उपाशीपोटी कॉफी सुद्धा नाही प्यायला पाहिजे. उपाशीपोटी कॉफी प्यायल्याने आपल्या शरीरातील ॲसिडिटी वाढते त्याचबरोबर पचनसंस्थेमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड वाढल्याने पोटाची समस्या जोर धरते.

कच्चे टोमॅटो

कच्चे टोमॅटो खाण्याचे अनेक फायदे आहेत, परंतु रिकाम्या पोटी कच्चे टोमॅटो खाणे हानिकारक ठरू शकते. टोमॅटोमध्ये असलेले अम्लीय गुणधर्म ज्यामुळे पोटदुखी यासारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करणे टाळावे.

फळांचा रस

तज्ञांच्या मते,दिवसाची सुरुवात फळांच्या रसाने अजिबात करू नये. फळांचा रस सकाळी उपाशीपोटी प्यायल्याने शरीरातील अग्नि मंडलावर विपरीत परिणाम होतो, जे आपल्या शरीरासाठी चांगले नसते. उपाशीपोटी रस प्यायल्याने फळांमध्ये उपलब्ध असणारे फ्रुक्टोज आपल्या लिव्हरवर अतिरिक्त भार टाकू शकतात आणि यामुळे लिव्हरची समस्या होऊ शकते.

मसालेदार पदार्थ

अनेक लोक सकाळी उठल्यावर नाश्ता मध्ये समोसा – कचोरी, भजी यासारखे मसालेदार पदार्थ सेवन करतात. सकाळी उठल्यावर नाश्ता मध्ये अशाप्रकारचा मसालेदार पदार्थांचा नाश्ता अजिबात करायला नाही पाहिजे, यामुळे पोटात जळजळ होऊ शकते.अनेकदा असे पदार्थ खाल्ल्याने ऍसिडिक रिएक्शन आणि ऍसिडिटी सारख्या समस्या त्रास देतात.


Edited By : Nikita Shinde

 

Manini