Monday, March 17, 2025
HomeमानिनीFashion Tips : स्टायलिश लूकसाठी पेंडेंट

Fashion Tips : स्टायलिश लूकसाठी पेंडेंट

Subscribe

आऊटफिट आणि मेकअपसह अॅक्सेसरीज देखील महत्वाचा भाग आहे. अॅक्सेसरीजमुळे आपला लूक सुंदर आणि परिपूर्ण दिसतो. हल्ली तुम्हाला अॅक्सेसरीजमध्ये असंख्य प्रकार पाहायला मिळतील. स्टायलिश लूकसाठी तुम्ही पेंडेंट देखील वापरू शकता. हे पेंडेंट तुमच्या कॅज्युअल, फॉर्मल किंवा ट्रॅडिशनल आऊटफिटवर देखील सहजपणे मॅच होईल. आज आपण जाणून घेऊयात स्टायलिश लूकसाठी कोणते पेंडेंट आपण वापरू शकतो.

गोल्डन पेंडेंट

राऊंड नेक डिझाइन असलेले ड्रेससह तुम्ही हे पेंडेंट सहजपणे घालू शकता. या पेंडेंटमध्ये तुम्हाला विविध डिझाइन्स देखील पाहायला मिळतील. या प्रकारच्या पेंडेंटमुळे तुम्हाला एक परिपूर्ण लूक मिळेल. हे तुम्हाला मार्केटमध्ये किंवा ऑनलाइन 2०० ते 3०० रुपयांना मिळेल.

स्टोन वर्क पेंडेंट

या प्रकारचा स्टोन वर्क पेंडेंट तुम्ही ड्रेससह स्टाइल करू शकता. या स्टोन वर्क पेंडेंटमध्ये तुम्हाला अनेक डिझाइन्स मिळतील. हे पेंडेंट तुम्हाला 300 ते 400 रुपयांना मिळेल.

मल्टी कलर पेंडेंट

जर तुमच्याकडे मल्टी कलर ड्रेस असेल तर तुम्ही मल्टी कलर पेंडेंट घालू शकता. या मल्टी कलर पेंडेंटमध्ये तुम्हाला अनेक सुंदर डिझाइन्स मिळतील. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे या पेंडेंटची निवड करू शकता. हे तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही ठिकाणी 400 ते 600 रुपयांपर्यत मिळेल.

कस्टमाइज पेंडेंट

तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पेंडेंट कस्टमाइज देखील करू शकता. यामध्ये तुम्हाला असंख्य प्रकार देखील मिळतील. हे तुम्ही मार्केटमध्ये किंवा ऑनलाइन काही वेबसाइडवरून तुम्ही हे बनवून घेऊ शकता. या पेंडेंटची किंमत तुमच्या डिजाइनवर अवलंबून असते.

एनिशल्स पेंडेंट

तुम्ही तुमच्या नावाचे एनिशल्स असलेले पेंडेंट देखील बनवून घेऊ शकता. बऱ्याच लोकांना असे पेंडेंट घालायला खूप आवडतात. हे पेंडेंट तुम्हाला 1०० ते 2०० पर्यंत मिळेल.

हेही वाचा : Fashion Tips : सिम्पल साडीवर या ज्वेलरी परफेक्ट


Edited By : Prachi Manjrekar

 

Manini