Sunday, November 24, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीRelationshipFreak Matching Relationship : तरुणाईमध्ये फ्रीक मॅचिंग रिलेशनशिपचा ट्रेंड

Freak Matching Relationship : तरुणाईमध्ये फ्रीक मॅचिंग रिलेशनशिपचा ट्रेंड

Subscribe

सध्याच्या जगात डेटिंगच्या दुनियेत रोज नवनवीन ट्रेंड आपल्याला पहायला मिळत आहेत. विशेषत: Gen Z च्या बाबतीत! खरंतर Gen Z साठी डेटिंग हे कोणत्याही अॅडव्हेंचरपेक्षा कमी नाही. अशात फ्रीक मॅचिंग खूप प्रसिद्ध होऊ लागले आहे. रिलेशनशिपचा हा एक असा प्रकार आहे ज्यामध्ये लोक आपल्या पार्टनरमध्ये आपली कॉपी शोधू लागतात. काही सोप्या शब्दांत जाणून घेऊयात या नव्या डेटिंग ट्रेंडबद्दल.

काय आहे फ्रीक मॅचिंग ?

फ्रीक मॅचिंगचा अर्थ आहे की एक असा जोडीदार शोधणं जो तुमचे छंद, आवडीनिवडी , तुमची स्वप्नं जाणून घेऊ शकतो. आणि तुम्हाला भक्कम साथ देऊ शकेल. जसे की तुम्हाला पुस्तकं वाचायला फार आवडत असतील तर तुम्ही असा जोडीदार शोधाल ज्याला पुस्तकं वाचायला फार आवडतात. किंवा जर तुम्हाला प्रवास करावासा वाटत असेल तर तुम्ही असा जोडीदार शोधण्याचा प्रयत्न कराल जे तुमच्यासोबत संपूर्ण जग फिरायला तयार असतील. हे केवळ प्रेम किंवा रोमान्सपुरतंच मर्यादित नाही तर एकमेकांसोबत एक नवा अनुभव शेअर करण्याची आणि एकमेकांसोबत वाढण्याची ही एक नवी संधी असते.

- Advertisement -

Freak Matching Relationship : Trend of Freak Matching Relationship in Youth

केव्हा आणि कधी आला हा ट्रेंड ?

प्रश्न हा पडतो की हा नवा शब्द ‘फ्रीक मॅचिंग’ अखेर कसा आणि केव्हा बनला? कमी वेळात हा शब्द कशाप्रकारे आपल्या नेहमीच्या भाषेचा भाग बनला ? याचं उत्तर आहे गायक टीनाशेचं गाणं ‘नेस्टी’. या गाण्यामध्ये एक अशी ओळ आहे की ‘Is somebody gonna match my freak?’ ज्याचा अर्थ असा होतो की ‘माझ्या आवडीनिवडीशी जुळवून घेणारं कोणी आहे का ?’ या गाण्याने सोशल मिडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता. एप्रिल महिन्यात रिलीज झालेल्या या गाण्याला आतापर्यंत 37 मिलियनपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. इतकेच नव्हे तर टीनाशेने स्वत:च या ट्रेंडला प्रोत्साहन देण्याचं काम केलं आहे.

- Advertisement -

कसा शोधाल ‘फ्रीक मॅच’ पार्टनर ?

जर तुम्हीदेखील फ्रीक मॅचिंग पार्टनरच्या शोधात असाल तर तुमच्या डेटिंग पार्टनरसोबत या विषयावर मोकळेपणाने चर्चा करा. त्यांना खुलेपणाने तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा, तुमचे छंद काय, तुम्हाला काय करायला आवडतं याविषयी गप्पा मारा. तुम्ही एका अशा जोडीदाराची निवड करा जी व्यक्ती केवळ तुमची साथच देणार नाही तर तुमच्या आवडीनिवडींना आणि स्वप्नांनाही साथ देईल. जरी ती व्यक्ती तुमच्या स्वप्नांना पूर्णपणे समजू शकत नसली तरी तुमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी ती तुम्हाला पर्सनल वेळ आणि पर्सनल स्पेस देऊ शकेल. लक्षात ठेवा की प्रत्येक व्यक्तीला त्याचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळायला हवी. आणि प्रत्येक नातं हे प्रामाणिकपणावर अवलंबून असतं. यासाठीच आपल्या जोडीदारासोबत नेहमी मोकळेपणाने चर्चा करा. खोटं बोलण्यापासून स्वत: ला रोखा. कारण यामुळे तुमचे नाते मजबूत होऊ शकणार नाही.

हेही वाचा : Vastu Tips : सुखी वैवाहिक जीवनासाठी वापरा या वास्तू टिप्स


Edited By – Tanvi Gundaye

- Advertisment -

Manini