Wednesday, March 19, 2025
27 C
Mumbai
Homeएज्युकेशनFree Online Courses : या फॉरेन युनिवर्सिटितून घरबसल्या फ्री मध्ये शिका कोर्सेस

Free Online Courses : या फॉरेन युनिवर्सिटितून घरबसल्या फ्री मध्ये शिका कोर्सेस

Subscribe

आजकालच्या डिजिटलच्या युगात स्वत:ला अपडेट ठेवणे खूप महत्त्वाचे झाले आहे. हल्ली केवळ उच्च दर्जाचे शिक्षण महत्वाचे नाही तर त्यासोबत तुम्हाला काही कौशल्य (Skills) येणंही महत्त्वाचे झाले आहे. वर्षानुवर्षे केल्या जाणाऱ्या पदव्यांसोबत काही सर्टिफिकेट कोर्सेस आणि ऑनलाइन डिग्रीही महत्वाची आहे. हे सर्टिफिकेट कोर्सेस आणि ऑनलाइन डिग्री डिजीटलच्या युगात भरघोस पगाराची नोकरी मिळवून देण्यासाठी फायदेशीर ठरतात. तुम्हीही अशा काही कोर्सेसच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. जगभरात अशी अनेक प्रतिष्ठित विद्यापीठे(Foreign Universities) आहेत जी मोफत ऑनलाइन कोर्सेस शिकवतात, जे तुम्ही अगदी घरबसल्या करू शकता. जर तुम्हाला तुमचे स्किल्स वाढवायचे असल्यास किंवा नवीन गोष्टी शिकायच्या असतील तर या फॉरेन युनिवर्सिटीची मदत घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊयात, कोणत्या युनिवर्सिटीतून तुम्ही फ्री ऑनलाइन कोर्स करू शकता.

हार्वर्ड विद्यापीठ (Harvard University)

जगातील सर्वात प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक असलेले हार्वर्ड विद्यापीठ शेकडो फ्री ऑनलाइन कोर्सेस देते. या विद्यापीठात तुम्ही हवामान बदलापासून ते न्यायापर्यत सर्व गोष्टींचा अभ्यास शिकू शकता. येथे काही कोर्सेस पूर्णपणे फ्री आहेत तर काही कोर्सेससाठी शुल्क आहेत. तुम्ही संपूर्ण माहितीसाठी विद्यापीठाची वेबसाइट online learning.harvard.edu चेक करू शकता.

स्टॅनफोर्ड विद्यापीठ (Stanford University)

तुम्ही स्टॅनफोर्ड विद्यापीठातून टेक्नोलॉजी, विज्ञान, आरोग्य, उद्योजकता आदी विषयांत कोर्सेस करू शकता. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी online.stanford.edu वर क्लिक करा. येथे तुम्हाला सर्व माहिती मिळेल.

जॉर्जिया इन्सिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (Georgia Institute of Technology)

जॉर्जिया इन्सिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या विद्यापीठातून अनेक वर्षांपासून फ्री कोर्सेस देण्यात येत आहेत. आत्तापर्यत जॉर्जिया इन्सिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विद्यापीठातून जवळपास 30 लाखांहून अधिक लोकांनी फ्री कोर्सेसचा लाभ घेतला आहे. येथून तुम्ही स्टॅटिस्टिक्स सारखे कोर्सेस करून तुमचे स्किल्स वाढवू शकता.

फॉरेन युनिवर्सिटितून कोर्सेस करण्याचे फायदे –

  1. कोणत्याही खर्चाशिवाय उच्च दर्जाचे शिक्षण मिळते
  2. घरी बसून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण आणि पदवी मिळवता येते.
  3. कोर्स पूर्ण केल्यानंतर सर्टिफिकेट मिळते.
  4. नवीन कौशल्यांमुळे नोकरी मिळविण्यात मदत होते

 

 

 

हेही पाहा –