Saturday, September 30, 2023
घर मानिनी Health French Fries खात असाल तर आधी हे वाचा

French Fries खात असाल तर आधी हे वाचा

Subscribe

बटाट्यापासून तयार करण्यात आलेले फ्रेंच फाइज खाणे सर्वांनाच आवडते. फ्राइज टेस्टी जरी असले तरीही ते दररोज खाल्ल्याने आरोग्याला धोका उद्भवू शकतो. मात्र डॉक्टर्स सुद्धा असे मानतात की, याचे अधिक सेवन केल्याने नुकसान होऊ शकते. फ्रेंच फाइज खाल्ल्याने नक्की कोणत्या समस्या येऊ शकतात याच बद्दल आपण जाणून घेऊयात. (health problem)

अमेरिकन जनरल ऑफ क्लीनिकल न्युट्रीशनच्या मते, जेव्हा जळजवळ 4500 तरुणांवर अभ्यास केला गेला तेव्हा धक्कादायक आकडेवारी समोर आली होती. त्यामध्ये असे सांगितले गेले होते की, जी लोक फ्रेंच फाइज एका आठवड्यातून 2 पेक्षा अधिक वेळा खातात त्यांचा लवकर मृत्यू होऊ शकतो.

- Advertisement -

-पोटात होऊ शकते समस्या
फ्रेंच फाइजचे पचन प्रोटीन आणि कार्बोहाइड्रेसच्या तुलनेत फार कमी वेगाने होते. कारण यामध्ये कॅलरीज अधिक असतात. ते दररोज खाल्ल्याने पोटदुखीची समस्या उद्भवू शकते. याव्यतिरिक्त डायरिया, उलटी आणि गॅसची समस्या सुद्धा उद्भवू शकते.

-रोगप्रतिकारक शक्तीवर होतो परिणाम
फ्रेंच फाइजचा थेट परिणाम तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. कारण काही वेळेस अशा खाद्यपदार्थात अनहेल्दी बॅक्टेरियाज तुमच्या गट माइक्रोबायोमला नुकसान पोहचवतात. यामुळे तुमच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते.

- Advertisement -

-हृदयासंबंधित आजाराचा धोका
फ्रेंच फाइज सतत खाल्ल्याने हृदयासंबंधित आजारांचा धोका वाढला जातो. अधिक तळलेले पदार्थ खाल्ल्याने धमन्यांमध्ये ब्लॉकेज तयार होतात. त्यामुळे हार्ट अटॅक आणि ट्रिपल वेसल डिजीज सारखे गंभीर आजार होऊ शकतात.

-वजन वाढू शकते
वजन वाढणे आजकाल एक सामान्य समस्या आहे. अशातच फ्रेंच फाइजसारखे हाय कॅलरीज असणारे फूड्स खाल्ल्यास कंबर, पोट आणि एकूणच लठ्ठपणा वाढण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. जर या समस्येपासून दूर रहायचे असेल तर अधिक तळलेल्या पदार्थांपासून दूर राहिले पाहिजे.


हेही वाचा- शिळं आणि अनहेल्दी फूड ठरु शकते PCOS चे कारण

- Advertisment -

Manini