Wednesday, May 31, 2023
घर मानिनी Health सारखं लघवीला होतंय? 'या' गंभीर आजारांचे असू शकतात संकेत

सारखं लघवीला होतंय? ‘या’ गंभीर आजारांचे असू शकतात संकेत

Subscribe

भरपूर पाणी प्यायल्यानंतर लघवी होणे ही सामान्य बाब आहे. मात्र काही लोकांना सातत्याने लघवी होत राहते. वारंवार लघवी होणे हे शारिरीक समस्यांचे कारण सुद्धा असू शकते. यामुळे जर तुम्हाला अशी समस्या होत असेल तर त्याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे. जर तुम्हाला सामान्य लघवीच्या तुलनेत अधिक वेळा लघवी होत असेल तर काही गंभीर आजारांचे संकेत असू शकतात.

एखादा व्यक्ती २४ तासांमध्ये खुप वेळा लघवी करण्यास जात असेल तर त्याला फ्रिक्वेंटली युरिनेशन श्रेणीत ठेवले जाते. रिपोर्ट्सनुसार, व्यक्तीला २४ तासात ८ किंवा त्यापेक्षा अधिक वेळा लघवी होत असेल तर तो या श्रेणीतील असतो. वारंवार लघवी होण्यामागे काही कारणं असू शकतात. यामुळे तुमच्या झोपेवर सुद्धा परिणाम होतो.

- Advertisement -

वारंवार लघवी होण्यामागील कारणं
काही विविध स्थिती आहेत. ज्यामुळे लघवी होत राहते. यामध्ये तुमचे वय, लिंग अथवा दोन्ही गोष्टींवर आधारित असते. असे असू शकते की, तुम्ही विविध कारणांमुळे तुमच्या संपूर्ण आयुष्यभर या समस्येचा सामना करु शकता. ही स्थिती नॉर्मल सुद्धा कधीकधी असू शकते. पण काही स्थितीत ती गंभीर असू शकते.

- Advertisement -

-युरिनरी ट्रॅक आणि ब्लॅडरची स्थिती ही वारंवार लघवी होण्याच्या स्थितीतील सर्वसामान्य स्थिती आहे. या मध्ये मुत्र मार्गात संक्रमण झाल्यास ही समस्या उद्भवू शकते. युटीआय दरम्यान बाहेरील संक्रमण शरिरात प्रवेश करते आणि युरिनच्या ठिकाणी सूज येते. काही गंभीर प्रकरणांमध्ये वारंवार लघवी होणे मुत्राशयाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते.

-मधुमेहाच्या स्थितीत सुद्धा वारंवार लघवी होते. जर तुम्हाला टाइम 1 आणि टाइप 2 मधुमेह असेल तर तुम्हाला ही समस्या होऊ शकते.

वारंवार युरिनेशन कसे कंट्रोल कराल?
-झोपण्यापूर्वी पातळ पदार्थ खाऊ नका
-अल्कोहोल आणि कॅफेनचे सेवन अधिक करु नका
-पेल्विक मसल्सच्या बळकटीसाठी केगेल एक्सरसाइज करा.
-जर तुम्ही एखादे औषध घेतत असाल जे शरिरातून लिक्विड बाहेर टाकत असेल तर अशा औषधांबद्दल डॉक्टरांना विचारा.


हेही वाचा- महिलांमध्ये ‘ही’ लक्षणं दिसत असल्यास वंधत्व येऊ शकते

- Advertisment -

Manini