Thursday, December 7, 2023
घरमानिनीKitchenRecipe: फ्राइड चीजी चिकन रेमन नूडल्स

Recipe: फ्राइड चीजी चिकन रेमन नूडल्स

Subscribe

जर तुम्हाला मॅगी खाऊन कंटाळा आला असेल तर काहीतरी हटके अशी रेमनची रेसिपी नक्की ट्राय करू शकता. आज आपण फ्राइज चीजी चिकन रेमन नूडल्सची रेसिपी पाहणार आहोत. (Fried cheese chicken ramen recipe)

- Advertisement -

साहित्य
रेमन नूडल्स 1 पाकिट
बटर 1 मोठा चमचा
लसणाचा 2 पाकळ्या (बारीक चिरलेल्या)
कांदा 1 (बारीक चिरलेला)
टोमॅटो 1 (बारीक चिरलेला)
हिरव्या मिर्च्या 2 (बारीक चिरलेल्या)
काळी मिरी- 1 चमचा
चिकनचे लहान तुकडे
चीज
सोया सॉस 1 मोठा चमचा
चिली फ्लेक्स 1/2 चमचा
स्वादानुसार मीठ

- Advertisement -

कृती
सर्वात प्रथम पॅनमध्ये चिकनचे तुकडे फ्राय करून घ्या
ही रेसिपी तयार करण्यासाठी नूडल्स शिजवून घ्या. (नूडल्स अधिक शिजवू नका)
पॅनमध्ये बटर टाका आणि त्यात आता बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या, मिरिची टाका. लसूण-मिर्ची व्यवस्थितीत फ्राय करा
आता त्यात टोमॅटो-कांदा टाका. टोमॅटो विरघळू द्या
1 मोठा चमचा सोया सॉस, 1/2 चमचा चिलि फ्लेक्स आणि स्वादानुसार मीठ टाका
आता जेव्हा सर्व मिश्रण तयार होईल तेव्हा त्यात रेमन नूडल्स आणि चिकनचे तुकडे टाका
सर्वात शेवटी रेमन नूडल्सवर चीज किसून टाका.


हेही वाचा- Recipe: घरी बनवा कोरियन मिरचीचे तेल

- Advertisment -

Manini