Saturday, January 4, 2025
HomeमानिनीRelationshipFriend Hoarding : मित्रमैत्रिणींमध्ये वाढतोय फ्रेंड होर्डिंगचा ट्रेंड

Friend Hoarding : मित्रमैत्रिणींमध्ये वाढतोय फ्रेंड होर्डिंगचा ट्रेंड

Subscribe

सध्या मित्रमैत्रिणींमध्ये एक नवा ट्रेंड पाहायला मिळतोय. ज्यालाच फ्रेंड होर्डिंग असं म्हटलं जाऊ लागलं आहे. सध्या बिझी जीवनशैलीमुळे लोक आपल्या मित्रांना एखाद्या पर्सनल प्रॉपर्टीप्रमाणे समजू लागले आहेत. आपण आपल्या खास मित्रमैत्रिणींना जर इतर मित्रमैत्रिणींना भेटवलं तर आपले खास मित्र आपल्यापासून दूर जातील की काय अशी भीती सध्या तरुण वर्गामध्ये निर्माण होऊ लागली आहे.

काय आहे फ्रेंड होर्डिंग ?

‘फ्रेंड होर्डिंग’ ही एक अशी पद्धत आहे ज्यामध्ये लोक स्वत:चे मित्र स्वत:पुरतेच मर्यादित ठेवतात. खरंतर मैत्रीमध्ये थोड्याफार प्रमाणात असुरक्षितता ही असतेच पण सोशल मिडिया आणि मॉर्डन लाइफस्टाईलने याला अधिकच उत्तेजन दिलं आहे. इंटरनेटने लोकांना एकदुसऱ्याशी जोडण्याचे काम केले आहे. परंतु यासोबत लोकांना एकमेकांपासून दूरदेखील केले आहे. आज लोक वेगवेगळ्या क्षेत्रात जरी काम करत असले तरी इंटरनेटवर मात्र एकमेकांशी विविध माध्यमांतून ते जोडलेले असतात. या वेगळेपणामुळेच लोकांमध्ये एक प्रकारचे सामूहिक एकटेपण निर्माण होऊ लागले आहे. ‘फ्रेंड होर्डिंग’ हा या एकटेपणापासून वाचण्याचा एक भाबडा प्रयत्न आहे.

- Advertisement -

लोक आपल्या मित्रांना एकमेकांना भेटण्यापासून का रोखतात ?

अनेकदा लोक आपल्या जुन्या मित्रांना नव्या मित्रांना भेटवायला घाबरतात. असं यासाठी कारण त्यांना भीती वाटत असते की आपल्या नव्या आणि जुन्या मित्रांमध्येच जर चांगली मैत्री झाली तर आपले मित्र आपल्याला विसरतील. या भावनेला ‘मैत्रीतील हेवा’ असं म्हटलं जातं. याव्यतिरिक्त लोकांनी आपल्या वेगवेगळ्या मित्रांसोबत वेगवेगळी ओळख बनवलेली असते. त्यामुळे जेव्हा असे सगळे मित्र एकत्र भेटतात तेव्हा हीदेखील एक भीती असते की आपली वेगवेगळी ओळख संपणार तर नाही.

Friend Hoarding: The trend of friend hoarding is increasing among friends

- Advertisement -

मैत्रीवर सोशल मिडियाचा परिणाम :

सोशल मिडियाने आणि इंटरनेटने मैत्रीच्या पद्धतीलाच पार बदलून टाकले आहे. आजकाल अनेक लोक घट्ट आणि जवळच्या मैत्रीमध्ये विश्वास ठेवतात. खरंतर या मैत्रीचे काही दुष्परिणामदेखील आहेत. त्यामुळेच त्यांचे मित्र मर्यादित असतात आणि ते नव्या मित्रांना जुन्या मित्रांना भेटवू इच्छित नाहीत. परंतु हे लक्षात घेतले पाहिजे की मित्रमैत्रिणी एकत्र भेटल्यास एक घट्ट नातं तयार होतं, नव्या ओळखी निर्माण होतात. यामुळे एक असा मित्रपरिवार तयार होतो जो कठीण प्रसंगी आपली सोबत करू शकेल. मित्रांमध्ये असणारा हा जिव्हाळा आपल्याला एक सुरक्षित जाणीव निर्माण करून देतो. आणि आपला आनंदही अनेक पटींनी वाढवतो.

हेही वाचा : Wedding Return Gift : लग्नात रिटर्न गिफ्ट देण्यासाठी बेस्ट ऑप्शन


Edited By – Tanvi Gundaye

- Advertisment -

Manini