Sunday, November 24, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीHealthHealth Tips : फ्रोझन फूड आरोग्यासाठी हानिकारक

Health Tips : फ्रोझन फूड आरोग्यासाठी हानिकारक

Subscribe

आजकालच्या व्यस्त शेड्यूलमुळे बऱ्याच लोकांना कमी वेळेत तयार होणारे पदार्थ खायला आवडतात. काही पदार्थ घरी बनवायला खूप वेळ लागतो. त्यामुळे आपण बऱ्याचदा फ्रोजन फूड खातो. हे झटपट आणि खूप स्वादिष्ट देखील लागतात. या फ्रोजन फूडला काही कापायची किंवा सोलायची आवश्यकता नसते. हे पदार्थ तळून खाल्ले जातात. हल्लीची पिढी मोठ्या प्रमाणात फ्रोजन फूडचे सेवन करते. परंतु तुम्हाला माहिती आहे का ? हे फ्रोजन फूड आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते.

फ्रोझन फूडमध्ये मोठ्या प्रमाणात सोडिअम वापरले जाते. या फूडमध्ये कोणत्याही प्रकारचे पोषक तत्वं नसतात. अशा पदार्थांचे नियमित सेवन केल्याने तुम्ही त्वरित आजारी पडू शकता. आज आपण जाणून घेऊयात, फ्रोजन फूड खाल्याने आरोग्याला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले.

- Advertisement -

उच्च रक्तदाब

फ्रोजन फूड जास्त प्रमाणात खाल्याने उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.

हृदयासाठी धोकादायक

बऱ्याचदा फ्रोझन फूडमध्ये पाम तेल आणि सोडियमचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. हे आपल्या हृदयासाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे हृदयविकाराचा धोका देखील उद्भवू शकतो.

- Advertisement -

बैड कोलेस्ट्रॉल वाढते

फ्रोझन फूडमध्ये असलेल्या ट्रान्स फॅट्समुळे शरीरात बैड कोलेस्ट्रॉल वाढतो आणि गुड कोलेस्ट्रॉल कमी होतो.

वजन वाढते

अशा पदार्थांमध्ये कॅलेरीस जास्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वजन वाढते.

कॅल्शिअम कमी होते

फ्रोझन फूडमुळे कॅल्शिअम कमी होते, त्यामुळे शरीरावर पांढरे डाग किंवा स्किनची समस्या उद्भवू शकते.

मधुमेह

फ्रोझन फूड हे ताजे ठेवण्यासाठी स्टार्चचा वापर केला जातो. त्यामुळे अन्नाची चव वाढते परंतु हे अन्न पचण्यापूर्वी त्याचे साखरेमध्ये रुपांतर होते. ज्यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते आणि मधुमेहाचा धोका संभावतो. त्यामुळे जास्त प्रमाणात फ्रोझन फूडचे सेवन हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

हेही वाचा : Health Tips : दह्यासोबत खाऊ नयेत हे पदार्थ


Edited By : Prachi Manjrekar

 

 

- Advertisment -

Manini