फळे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. फळातील पोषक घटकांमुळे शरीराला अनेक फायदे होतात. वास्तविक, फळामध्ये भरपूर फायबर असते, जे पोटाच्या आरोग्यासाठी उत्तम असते. वेट लॉस करायचे असल्यास आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी फळे महत्त्वाची भूमिका बजावतात. फळांतील व्हिटॅमिन्स, आयर्न, ऍटी-ऑक्सिडंट, फायटोकेमिकल्स शरीरातील जूनाट आजार दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जातात. निरोगी राहण्यासाठी तज्ज्ञही फळांचे सेवन करण्याचा किंवा ज्यूस पिण्याचा सल्ला देतात. पण, फळे खावीत की फळांचा ज्यूस प्यावा? आरोग्याच्यादृष्टीने अधिक योग्य काय आहे? असे प्रश्न तुम्हाला कधी पडले आहेत का? चला जाणून घेऊयात सविस्तर लेखातून या प्रश्नांची उत्तरे,
फळे खाल्ल्यास काय होते ?
आहारतज्ज्ञांच्या मते, जेव्हा आपण फळे खातो तेव्हा आपल्याला भरपूर व्हिटॅमिन्स आणि आयर्न अधिक मिळतात. याशिवाय फळांमध्ये असलेले फायबर देखील शरीरासाठी गरजेचे आहे. फायबरमुळे पचन व्यवस्थित होते आणि रक्तातील साखर नियंत्रित राहते. फायबरमुळे पोट बराच वेळ भरलेले राहते. परिणामी, कॅलरीजचे प्रमाण नियंत्रित होते. कॅलरीज नियंत्रणात राहिल्याने वजन वाढत नाही. फळे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि त्वचा सुधारते.
फळांचा ज्यूस प्यायल्यावर काय होते ?
आहारतज्ज्ञांच्या मते, जेव्हा आपण फळांचा रस काढून त्यातील ज्यूस पितो तेव्हा त्यातील फायबर मोठ्या प्रमाणात नष्ट होतात. यामुळे फळांच्या ज्यूसमधील पौष्टिकता कमी होते. एकदरंच, फळ खाल्ल्याने जितका फायदा होतो तितका ज्यूस प्यायल्याने होत नाही. पण, म्हणून तुम्ही फळांच्या ज्यूस पिऊ नये असे तज्ञ सांगत नाही. फळांप्रमाणेच फळांचा ज्यूसही फायदेशीर असतो. त्यातील साखर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
ज्यूस पिताना घ्यावी ही काळजी
- ताज्या फळांचा ज्यूस प्यावा.
- फळांच्या रसात अतिरिक्त साखर मिसळू नये.
- पॅक केलेला फळांचा ज्यूस पिऊ नये.
हेही पाहा –