Be careful : ‘फ्रुट शेक’ पिणे किती फायदेशीर? वाचा काय सांगतं ‘आयुर्वेद’

काही मंडळी मोठ्या प्रमाणावर 'फ्रुट शेक'चं(fruit shake) सेवन सुद्धा करतात. पण आयुर्वेदानुसार हे शेक तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.

आपल्या निरोगी आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी सकस आहार घेणे हे उत्तम असते. सकस आणि चौकस आहार घेतल्याने त्या पदार्थांमधील पोषक घेतला शरीरासाठी उपयुक्त ठरतात. काही मंडळी मोठ्या प्रमाणावर ‘फ्रुट शेक’चं(fruit shake) सेवन सुद्धा करतात. ‘फ्रुट शेक’ (fruit shake) आरोग्यासाठी फायदेशीर सुद्धा मानले जातात. ‘फ्रेट शेक’चं सेवन कधी नाश्ता म्हणू तर कधी उन्हाळ्यापासून अराम मिळावा, थंडावा मिळावा म्हणून केले जाते. पण हे ‘फ्रुट शेक’ काही वेळा आपल्या आरोग्यासाठी घातक सुद्धा ठरू शकतात. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल तर या संदर्भात ‘आयुर्वेद'(ayurveda) नेमकं काय सांगतं ते नक्की वाचा.

आणखी वाचा – फ्रीजमधून येत असेल दुर्गंधी तर वापरा ‘या’ टिप्स

 

हल्ली अनेक जण त्यांच्या आहारात फ्रुट शेकचा समावेश करतात. फळांचा रस आणि दूध यांचा समावेश करून फ्रुट शेक तयार केला जातो. फ्रुट शेक आरोग्यासाठी फायदेशीर आहे असं समजलं जातं. पण ‘आयुर्वेदानुसार’ फ्रुट शेक हा तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामध्ये विशेषत्वाने बनाना शेक आणि मँगोचा समावेश करण्यात आला आहे. बऱ्याच वेळा लहान मुलांच्या आहारात सुद्धा या फ्रुट शेकचा(fruit shake) समावेश करण्यात येतो. पण आयुर्वेदानुसार हे शेक तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.

आणखी वाचा – चिंचेच्या पानांचा चहा कधी प्यायला आहे का ? ‘हे’ आहेत फायदे

आयुर्वेदानुसार(ayurveda) फ्रुट शेक तुमच्या शरीरासाठी का हानिकारक आहे. त्याचबरोबर फळं आणि दूध यांचं सेवन करण्याची योग्य पद्धत काय आहे तेही जाणून घ्या.

 

आयुर्वेदानुसार फळं आणि दूध यांचं मिश्रण चुकीचं

– फळं आणि दूध यांचं एकत्र सेवन करणं आयुर्वेदाच्या दृष्टीने चुकीचं आहे, कारण फळं आणि दूध यांचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. तसेच ते एकमेकांविरोधी आहेत त्यामुळे ह्या दोन्ही पदार्थांचं सेवन केल्याने त्याचा पचन संस्थेवर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोटदुखी या सारख्या समस्या उद्भवू शकतात. त्याचसोबत फळांमध्ये अनेक रासायनिक द्रव्य असतात जे दुधात मिळसल्याने त्याचा प्रकृतीवर चुकीचा परिणाम होतो.

आणखी वाचा – रिकाम्या पोटी हळदीचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

 

का पिऊ नये मँगो आणि बनाना शेक

– मँगो शेक(mango shake) आणि बनाना शेक(banana shake) उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात प्यायले जातात. पण आंब्यामध्ये आम्ल आणि सायट्रिक ऍसिड असते आणि केळ्यामध्ये अनेक रासायनिक घटक असतात जे दुधामध्ये मिसळल्याने पचनाचा त्रास होतो. आणि पोटदुखी सुद्धा होऊ शकते.

 

आणखी वाचा – Hindu Shastra : दुर्भाग्य दूर करण्यासाठी सकाळी उठताच करा ‘ही’ एक गोष्ट

दूध आणि फळांचं सेवन कसं करावं

– आयुर्वेदामध्ये आंबा(mango) आणि केळे(banana) खाल्ल्यानंतर शरीर मजबूत होते. पण या दोन फळांसोबत दुधाचं एकत्र सेवन करू नये. किंवा ही दोन फळे खाल्ल्यानंतर लगेचच दूध पिऊ नये. दोन्ही च्या सेवनादरम्यान काही कालावधी जाऊ द्यावा. त्यामुळे कोणतेही फळ खाल्ल्यांनंतर किमान एक ते दोन तासांनीच दूध प्यावे. असे केल्यास तुम्हला दुध आणि फळे या दोन्हीचे गुणधर्म मिळतील. या पद्धतीने फळे आणि दूध यांचं सेवन केल्यास तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल आणि त्याचा तुमच्या शरीरावर झालेला चांगला फरक जाणवेल.