Saturday, March 22, 2025
HomeमानिनीFashion Tips : मॉडर्न टचसाठी फूल स्लीव्स ब्लाउज

Fashion Tips : मॉडर्न टचसाठी फूल स्लीव्स ब्लाउज

Subscribe

साडी किंवा लेहेंग्यासह परिपूर्ण ब्लाउज तुमचा लूक आणखी सुंदर बनवू शकतो. हल्ली साडी इतकंच ब्लाउजला देखील खूप महत्व दिले जाते. तुम्हाला साड्यांसह ब्लाउजचे देखील असंख्य प्रकार पाहायला मिळतील. जो तुमचा लूक खूप सुंदर आणि परिपूर्ण करू शकतात. आज आपण मॉडर्न टचसाठी कोणते सुंदर ब्लाउज स्टाइल करू शकतो ते जाणून घेऊयात.

एम्ब्रॉयडरी वर्क ब्लाउज

तुम्ही या एम्ब्रॉयडरी वर्क असलेल्या ब्लाउजची निवड करू शकता. या ब्लाउजवर खूप सुंदर भरतकाम केलं गेलं आहे. असे ब्लाउज तुम्हाला मॉडर्न आणि क्लासिक टच देतील. हे ब्लाउज तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही ठिकाणी सहजपणे मिळेल. या प्रकारचा ब्लाउज तुम्ही शिवून देखील घेऊ शकता.

पफ ब्लाउज

पूर्वीच्या काळी पफ ब्लाउजची फॅशन होती. आता पुन्हा ही फॅशन खूप ट्रेंडमध्ये आहे. मॉर्डन आणि क्लासी लूकसाठी तुम्ही अशा ब्लाउजची निवड करू शकता. हे ब्लाउज पफ स्लीव्समध्ये येतात. या प्रकारच्या ब्लाउजमध्ये तुमचा लूक खूप सुंदर दिसेल. असे ब्लाउज तुम्हाला आता सगळीकडे मिळेल. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे या ब्लाउजची निवड करू शकता.

नेट स्लीव्स ब्लाउज

जर तुम्हाला कोणत्या पार्टी किंवा इव्हेंटला जायचं असेल तर हा नेट स्लीव्स ब्लाउज उत्तम आहे. हा ब्लाउज जाळीपासून बनवलेला आहे आणि गोल गळ्यातील डिझाइनमध्ये येतो. या प्रकारच्या ब्लाउजमुळे तुमचा लूक खूप मॉडर्न आणि सुंदर दिसेल. तुम्ही हा ब्लाउज काळ्या किंवा कोणत्याही गडद रंगाच्या साडीसह स्टाइल करू शकता.

स्टायलिंग टिप्स

  • तुम्ही या ब्लाउजची निवड तुमच्या साडीप्रमाणे करू शकता.
  • सिम्पल साडीवर स्टायलिश ब्लाउज खूप सुंदर दिसेल.
  • ब्लाउजप्रमाणे ज्वेलरीची निवड करू शकता .

हेही वाचा : Fashion Tips : ऑफिस इव्हेंटसाठी परफेक्ट साडी


Edited By : Prachi Manjrekar

Manini