Thursday, March 27, 2025
HomeमानिनीKitchen Tips : फ्रीजच्या रबरवर फंगस , घरात आणेल आजार

Kitchen Tips : फ्रीजच्या रबरवर फंगस , घरात आणेल आजार

Subscribe

तुमच्या फ्रिजच्या रेफ्रिजरेटरचा दरवाजा घाण झाला आहे का ? जर त्यावर काळे डाग दिसत असतील तर ते घरात बॅक्टेरियास आणू शकतात. अन्नपदार्थ देखील खराब होऊ शकते आणि हे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. बऱ्याचदा तुम्ही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेल्या अन्नपदार्थांना बुरशी लागू शकते. बऱ्याचदा फ्रिजच्या रेफ्रिजरेटरचा दरवाजा स्वच्छ करणे एका आव्हनाप्रमाणे असते. हे सामान्य साबण किंवा पाण्याने याचे डाग सहजासहजी काढले जात नाहीत. त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात. हे डाग प्रभावीपणे दूर कसे करावे.

बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचा वापर करा

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर हे बुरशी काढून टाकण्यासाठी उत्कृष्ट उपाय आहे. एका भांड्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा पांढरा व्हिनेगर मिसळा. आणि हे मिश्रण सीलिंग रबरवर लावा. ते 1० मिनिटे तसेच राहू द्या आणि जुन्या टूथब्रशने हळूवारपणे घासून घ्या आणि नंतर स्वच्छ कापडाने पुसून टाका.

लिंबू आणि मीठ

लिंबूमध्ये असलेले सायट्रिक आम्ल हे बुरशी काढून टाकण्यासाठी उत्तम आहे. आता अर्धा लिंबू घ्या त्यामध्ये मीठ शिंपडा आणि ते रबरवर चांगले चोळा.काही वेळाने, ते ओल्या कापडाने पुसून टाका.

हायड्रोजन पेरोक्साइड

जर बुरशी खूप खोलवर रुजली असेल तर हायड्रोजन पेरोक्साइड वापरा. ते थेट प्रभावित भागावर स्प्रे करा आणि 5 मिनिटांनी ब्रशने स्वच्छ करा.

बुरशीची निर्मिती रोखण्यासाठी उपाय

  • आठवड्यातून एकदा कोरड्या कापडाने सीलिंग रबर स्वच्छ करा.
  • रेफ्रिजरेटरचा दरवाजा जास्त वेळ उघडा ठेवू नका, यामुळे आर्द्रता वाढते.
  • महिन्यातून एकदा बेकिंग सोडा आणि पाण्याने रबर स्वच्छ करा.
  • जर तुम्ही हे सोपे उपाय अवलंबले तर तुमचा रेफ्रिजरेटर केवळ स्वच्छ राहणार नाही, तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वास किंवा बुरशी देखील जमा होणार नाही.

हेही वाचा : Kitchen Tips : रुचकर जेवणासाठी खास टिप्स


Edited By : Prachi Manjrekar

Manini