Sunday, December 3, 2023
घरमानिनीFashionफर असणारे विंटर जॅकेट घरच्या घरी असे धुवा

फर असणारे विंटर जॅकेट घरच्या घरी असे धुवा

Subscribe

थंडीत आपण उबदार कपडे घालतो. अशातच फर असणारे जॅकेट जरुर घातले जाते. पण ते स्वच्छ नक्की कसे करायचे असा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. कारण हे सेंसिटिव्ह फॅब्रिक असते. यामुळे ते अधिक ड्राय क्लिनिंग सुद्धा करू शकत नाही. जर तुम्हाला अधिक पैसे खर्च न करता फर असणारे विंटर जॅकेट धुवायचे असेल तर पुढील काही टिप्स फॉलो करू शकता.

असे धुवा फर असणारे जॅकेट
फर असणारे जॅकेट हे कधीच वॉशिंग मशीनमध्ये धुवू नका. ते नेहमीच हाताने धुवा. अशातच ते कोणत्याही डॅमेज शिवाय जॅकेट स्वच्छ करण्यााठी एका टबमध्ये थंड पाणी भरा आणि २ कॅपफुल किंवा वूल अॅन्ड कश्मीरी शॅम्पूचा एक स्प्रिट्स टाका. त्यानंतर ते पाण्यात हलक्या हाताने घासत धुत रहा जो पर्यंत त्याचा फेस जात नाही.

- Advertisement -

How To Care For A Fur Coat - Red Hanger

दुर्गंधी हटवण्यासाठी करा हे उपाय
सर्वात प्रथम जॅकेट एका ठिकाणी पसरून ठेवा. त्यानंतर त्यावर बेकिंग सोडा स्प्रे करून रात्रभर तसेच ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यावरील सोडा झटका. असे केल्याने त्याला येणारी दुर्गंधी दूर होईल. असे करूनही दुर्गंध दूर झाला नसेल तर हिच ट्रिक पुन्हा करा.

- Advertisement -

या गोष्टींची घ्या काळजी
फर असणारे कपडे अत्यंत सेंसिटिव्ह असतात. अशातच ते वारंवार धुण्याची चूक करू नका जॅकेटची क्वालिटी उत्तम रहावी म्हणून केवळ एकदाच ते धुवा.


हेही वाचा- हिवाळ्यात वापरा ‘हे’ फॅन्सी जॅकेट

- Advertisment -

Manini