हिंदू धर्मात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी देशभरात प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये गणेश मूर्तींची स्थापना केली जाते. संपूर्ण राज्यभरात 10 दिवस गणेशोत्सवाचा जल्लोष असतो. प्रत्येक ठिकाणी गणपतीची पूजा-आराधना केली जाते. सगळीकडे उत्साह आणि चैतन्याचं वातावरण असतं. या वर्षी 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे.
दरम्यान, सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची लगभग सुरू झाली आहे. घरोघरी साफ-सफाई करायला सुरूवात झाली आहे. गणपती-गौराईच्या पूजेसाठी लागणाऱ्या पूजेच्या भांड्यांची साफ-सफाई केली जात आहे. यामध्ये तांब्याची, पितळेची भांडी, दिवे, समई, ताट, ताम्हण यांना चकचकीत करण्यासाठी अनेकजण पितांबरीचा वापर करतात. परंतु यामुळे भांडी साफ करूनही पुन्हा काळपट दिसू लागतात. अशावेळी तुम्ही पितांबरी ऐवजी आम्ही दिलेल्या नवीन टिप्स नक्की ट्राय करा.
तांब्या, पितळेची भांडी लख्ख करण्यासाठी करा ‘हा’ उपाय
- पितांबरी व्यतीरिक्त तांब्या, पितळेची भांडी साफ करण्यासाठी तुम्ही चिंच, लिंबू आणि मीठाचा वापर करू शकता.
- त्यासाठी सर्वप्रथम गॅसवर मोठ्ठ भांड ठेवून त्यात पाणी ओतून ते गरम करा. आता त्यामध्ये चिंच, लिंबाचा रस आणि मीठ घाला.
- आता या सर्व मिश्रणात तांब्या, पितळेची भांडी घाला आणि ती उकळून घ्या. अवघ्या काही वेळात तुमची सर्व भांडी चकचकीत होतील.