बाप्पाचा आवडता नैवद्य म्हणजे मोदक…त्यामुळे आतापर्यंत आपण चॉकलेट, पनीर, खवा अशा वेगवेगळ्या मोदकांची आपण रेसिपी पाहिली आहे आणि आज आपण नारळापासून मोदक कसा तयार करायचा हे पाहणार आहोत.
साहित्य :
- 1 किसलेला नारळ
- 1/4 डबा कन्डेन्स् मिल्क
- 2 चमचे गुलाब पाणी
- 1 वाटी चॉकलेट
- 1 चमचा तुप
कृती :
- प्रथम एका भाड्यात नारळ घ्या. त्यात पाऊण डबा कन्डेन्स् मिल्क टाका.
- त्यानंतर 2 चमचे गुलाब पाणी टाकून घ्या. हे सर्व मिश्रण एकत्रित करुन घ्या.
- त्यानंतर मोदकाच्या साच्याला तुप लावा आणि साच्यामध्ये तयार मिश्रण भरुन मोदक तयार करुन घ्या.
- त्यानंतर चॉकलेट वितळवुन घ्या आणि वितळलेल्या चॉकलेटमध्ये तयार केलेल्या मोदकाचा अर्धा भाग बुडवा आणि फ्रिजमध्ये 20 मिनिटे सेट होण्यासाठी ठेवा.
- अशाप्रकारे तुमचे झटपट नारळाचे मोदक तयार.
- Advertisement -
हेही वाचा :
Ganesh Chaturthi 2023 : गुड-डे बिस्किट मोदक
- Advertisement -
- Advertisement -