Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल Ganeshotsav 2021 : यंदा बाप्पाला दाखवा पान मोदक ते चॉकलेट फ्युजन आणि...

Ganeshotsav 2021 : यंदा बाप्पाला दाखवा पान मोदक ते चॉकलेट फ्युजन आणि जेलीचा नैवेद्य

Related Story

- Advertisement -

घरोघरी अवघ्या काही तासातच विघ्नहर्त्याचे आगमन होणार (Ganeshotsav 2021)आहे. बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता , विघ्नहर्ता, मंगलमुर्ती. आपल्या जीवनात आनंद निर्माण करणारा लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यासाठी सर्वजन सज्ज झाले आहे. गणरायाला विराजमान होण्यासाठी आरास, लाईटींग, पुजाविधीचे साहीत्य आशा नानाविधींची दखल प्रत्येक भक्त घेत असतो. याचप्रमाणे बाप्पाला सर्वाधीक आवडणारा पदार्थ म्हणजे मोदक देखील बनवण्याची तयारी आता सुरु झाली आहे. बाजारपेठेत अनेक प्रकारचे मोदक मिळतात हे टेस्टी आणि रंगीबेरंगी,चवदार मोदक पाहून प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते. बाप्पासाठी खास नैवैद्य म्हणून मोदक तयार केले जातात. सध्या मोदकांच्या स्वादामध्ये, टेस्टमध्ये देखील बदल झाला आहे. अनेक चवदार चॉकलेट ,पान मोदक आणि फ्यूजनसह मोदक तयार केले जातात. पाककला तज्ज्ञ आणि सल्लागार शेफ, रितू उदय कुगाजी म्हणतात, “काळ बदलत आहे आणि लोक विविध प्रकारचे मोदक वेगवेगळ्या स्वादांसह तयार करतात – गुलाब पाकळी आणि कस्टर्ड सफरचंद मोदक, मीठ कॅरमेल आणि बक्लवापर्यंत अनेक मोदकांची वेरायटी बाजारपेठेत सहज उपलब्ध होते. चला तर मग पाहुयात या मोदकांची झलक.(Ganeshotsav:Paan modaks to chocolate fusions and jelly)

 

जेली मोदक-
- Advertisement -

रंगतदार, लुसलुशीत, सॉफ्ट असे दिसणारे चविष्ठ जेली मोदक अनेक फ्लेवर ॲड करुन तयार करण्यात येतात. हे दिसायला जितके सुंदर खायायला तितकेच टेस्टी आहेत.

चॉकलेट मोदक-
- Advertisement -

चॉकलेट तर प्रत्येकाचा आवडता पदार्थ मात्र त्याचे मोदकात रुपांतर झाले तर बात काही औरच आहे. चॉकलेट आणि मोदकाचं कॉम्बिनेशन पाहून प्रत्येकाला हा चॉकलेट मोदक खाण्याचा मोह नक्कीच होणार.

पान मोदक-

जर तुम्हांला जेवणानंतर चवदार पानांचा आस्वाद घेण्याची सवय असेल तर मोदक पान तुम्ही नक्कीच ट्राय करा.

फळांचे मोदक-

हे मोदक सफरचंद आणि दालचिनी पासून तयार करण्यात आले आहेत. तसेच यामध्ये कुरकुरीतपणा आणण्यासाठी अक्रोडचा वापर केला आहे.

भाजलेल्या नाचणीचे मोदक

अनेकदा जे व्यक्ती डाएटवर असतात किंवा मधुमेह सारखा आजर असणाऱ्या रुग्णांना बहुतेकवेळा गोडधोड मोदक खाता येत नाही यामुळे नाचणीच्या मोदकाचा पर्याय त्यांच्यासाठी योग्य ठरू शकतो. यामुळे त्यांना मोदकही खाता येईल आणि ओरोग्यही चांगले राहील.


हे हि वाचा – Ganesh Chaturthi 2021: ‘या’ शुभ मुहूर्तावर करा आपल्या लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापणा

- Advertisement -