Sunday, February 9, 2025
HomeमानिनीGardening Tips : लहान बाल्कनीसाठी क्लाइम्बिंग प्लान्टस चे ऑप्शन्स

Gardening Tips : लहान बाल्कनीसाठी क्लाइम्बिंग प्लान्टस चे ऑप्शन्स

Subscribe

बाल्कनी हिरवीगार आणि सुंदर बनवण्यासाठी एक छोटीशी बाग तयार करणं हा एक उत्तम मार्ग आहे. कमी जागेत लावलेली क्लाइम्बिंग प्लान्टस तुमच्या बाल्कनीला सुंदरता तर देतीलच. सोबतच एक प्रसन्न आणि ताजेतवाने वातावरणही तयार करतील. ही झाडे केवळ सजावटीसाठी नसतात तर या झाडांमुळे पर्यावरणही शुद्ध होते. आजच्या या लेखात जाणून घेऊयात क्लाइम्बिंग प्लान्ट्स कोणत्या प्रकारचे आहेत आणि घरी हे क्लाइम्बिंग प्लान्टस लावल्याने काय फायदा होऊ शकतो याबद्दल.

विस्टेरिया वनस्पती 

विस्टेरिया वेली बाल्कनीसाठी योग्य आहेत. त्याची जांभळी आणि पांढरी फुले अतिशय आकर्षक असतात. ही लाकडी वेल कालांतराने घट्ट होत जाते आणि तुमच्या बागेत सौंदर्य वाढवते.

Gardening Tips Climbing Plant Options for Small Balcony

हायड्रेंजिया वनस्पती

हायड्रेंजिया वेल त्यांच्या रंग बदलणाऱ्या फुलांसाठी प्रसिद्ध आहेत. गुलाबी, निळी आणि पांढरी फुले बाल्कनीला एक अप्रतिम लूक देतात. हे सहजपणे भिंतींवर किंवा टेरेसवर लावले जाऊ शकतात.

स्मिलॅक्स वनस्पती

स्मिलॅक्स हे एक हलके आणि सुंदर क्लाइम्बिंग प्लान्ट आहे. त्याच्या हिरव्या वेलींमुळे बाल्कनी हिरवीगार दिसते आणि त्याची देखभाल करणे देखील खूप सोपे आहे.

मनी प्लांट

मनी प्लांट हे भारतातील सर्वात लोकप्रिय क्लाइम्बिंग प्लान्ट आहे. अनेकांच्या घरी हे सहज आपल्याला पाहायला मिळते. कमी प्रकाशात आणि पाण्यातही याची लागवड करता येते. हे केवळ सजावटीसाठी नाही तर हे हवा देखील शुद्ध करते.

 

ट्रम्पेट फ्लॉवर

ट्रम्पेट फ्लॉवर वेलला येणारी सुंदर केशरी आणि लाल फुले बाल्कनीला जिवंत करतात. ही वेल लवकर वाढतो आणि भिंतींना नैसर्गिक पडद्यासारखा देखावा देतो.

Gardening Tips Climbing Plant Options for Small Balcony

पॅसिफ्लोरा वनस्पती

पॅसिफ्लोरा, ज्याला कृष्णकमल देखील म्हणतात. यामुळे बाल्कनीला एक आश्चर्यकारक आणि आकर्षक देखावा मिळतो. त्याची फुले त्यांच्या अनोख्या रचनेसाठी आणि सुगंधासाठी ओळखली जातात.

चिनी चमेली

चायनीज चमेली त्याच्या पांढऱ्या फुलांमुळे आणि सुगंधामुळे अत्यंत लोकप्रिय आहे. बाल्कनीमध्ये आनंददायी वातावरण निर्माण करण्यासाठी हा योग्य पर्याय असू शकतो.

गुलाब

गुलाबाच्या विविध जाती बाल्कनीला रॉयल लूक देतात. ही वनस्पती तिच्या सुंदर फुलांसाठी आणि सुगंधासाठी ओळखली जाते.

इपोमिया

इपोमियाला मॉर्निंग ग्लोरी असेही म्हणतात. ही झपाट्याने वाढणारी वेल आहे. त्याची रंगीबेरंगी फुले सकाळी खूप सुंदर दिसतात.

क्लाइंबिंग प्लांट्स बाल्कनी गार्डन सुंदर तर बनवतातच, पण कमी जागेचाही चांगला वापर करतात. बाल्कनीत हिरवळ आणण्यासोबतच ही झाडे हवा शुद्ध करण्यातही मदत करतात.

हेही वाचा : Beauty Tips : टॅन स्किनसाठी घरीच बनवा फेसपॅक


Edited By – Tanvi Gundaye

Manini