Monday, February 17, 2025
HomeमानिनीGardening Tips : घरच्या बागकामासाठी व्हिनेगर आहे फायदेशीर

Gardening Tips : घरच्या बागकामासाठी व्हिनेगर आहे फायदेशीर

Subscribe

व्हिनेगरचा वापर आपण सगळेच आपल्या घरात करत असतो. जेवण बनवण्यापासून ते पृष्ठभाग साफ करण्यापर्यंत तसेच कपडे साफ करण्यासाठीही व्हिनेगरचा वापर केला जातो. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की व्हिनेगरचा वापर तुम्ही बागकामासाठी देखील करु शकता.

वाढलेले तण काढून टाकण्यासाठी :

झाडांच्या मध्ये मध्ये वाढलेले तण खरंतर झाडांना खराब करू शकतात. त्यांना काढून टाकण्यासाठी तुम्ही व्हिनेगरचा वापर करु शकता. तुम्ही वाढलेले तण जिथे दिसतील त्यावर सरळ व्हिनेगर शिंपडू शकता. लक्षात असू द्यात की तुम्हाला ज्या वनस्पती अधिक वाढलेल्या दिसतील केवळ त्यावरच व्हिनेगर शिंपडायचे आहे, ज्या वनस्पती तुम्हाला हव्या आहेत त्यावर व्हिनेगर शिंपडू नका. जर तुम्ही विषारी कीटकनाशकाचा उपयोग करु इच्छित नसाल तर पाळीव प्राणी आणि लहान मुलांसाठी हा सोयीस्कर उपाय आहे.

बागकामाचे टूल्स साफ करण्यासाठी :

व्हिनेगरचा वापर बागकामाचे टूल्स साफ करण्यासाठी केला जातो. बागकामाचे टूल्स साफ करण्यापूर्वी आधी ते पाण्याने धुवून घ्या. आता व्हिनेगरला पाण्यात मिक्स करुन कपड्याच्या मदतीने टूल्स पुसून घ्या. यामुळे टूल्स बॅक्टेरिया फ्री बनू शकतील. तुम्ही व्हिनेगरच्या मदतीने घमेल्याला लागलेले डाग किंवा घाणदेखील स्वच्छ करु शकता. काही व्यक्ती आपल्या गार्डनला सुंदर बनवण्यासाठी चिनीमातीच्या कंटेनरचा वापर करतात. अशावेळी तुम्ही त्या कंटेनरला व्हिनेगरच्या साहाय्याने धुवू शकता. यामुळे कंटेनरवर असणारी घाण निघून जाईल व त्याचा रंगही पुन्हा येईल.

फूल उगवण्यास मदत होईल :

रोडोडेंड्रोन आणि एजीलियासारखी काही रोपे आम्लयुक्त मातीमध्ये उगवतात. अशावेळी तुम्ही व्हिनेगरचा वापर करु शकता. यासाठी जवळपास चार लीटर पाण्यामध्ये एक कप व्हिनेगर टाका. आणि याला झाडांच्या मातीत मिसळा.

मुंग्यांपासून सुटका मिळवा :

फळांपासून ते भाज्यांपर्यंत सर्वांना मुंग्या लागणे ही एक सामान्य गोष्ट आहे. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही व्हिनेगर आणि पाणी यांना समप्रमाणात मिसळा. यानंतर जिथे मुंग्या आहेत त्या भागावर स्प्रे बॉटलच्या मदतीने शिंपडा.

बिया उगवण्यासाठी करा वापर :

बीजरोपण करण्यासाठी एक रात्र आधी बियांना 500 मिली पाणी आणि 125 मिली व्हिनेगरमध्ये मिसळून भिजत ठेवा. यामुळे बिया लगेच अंकुरित होऊ शकतील.

किड्यांना दूर पळवा :

किडे आपल्या बागेमध्ये नुकसान पोहोचवू शकतात. व्हिनेगर हे होण्यापासून थांबवू शकते. किडेकिटकं दूर पळवण्यासाठी तुम्ही बागेच्या किनाऱ्यांवर व्हिनेगर पसरवू शकता. जर तुमच्या बागेत लावलेल्या फळांच्या रोपांवर माश्यांन अॅटॅक केला असेल तर व्हिनेगरच्या मदतीने तुम्ही याला दूर करू शकता. यासाठी एका बाटलीमध्ये एक कप पाणी, अर्धा कप व्हिनेगर,एक चतुर्थांश कप साखर आणि एक मोठा चमचा गूळ मिसळून झाडावर स्प्रे करा.


Edited By – Tanvi Gundaye

Manini