घरलाईफस्टाईललसणाची साल देखील आहे खूप फायदेशीर; असा करा वापर

लसणाची साल देखील आहे खूप फायदेशीर; असा करा वापर

Subscribe

भारतीय आहारात लसणाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. लसणामुळे अन्न चवदार लागते. दररोज वापरला जाणारा लसूण सोलून झाल्यानंतर त्याची साल फेकतो. मात्र, तुम्हाला माहित आहे का, लसणाची साल देखील शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.

लसणाच्या सालीचे अगणित फायदे

What to do with Garlic Skin | Fine Dining Lovers

- Advertisement -

लसणाच्या सालीमध्ये अँटी-फंगल गुणधर्म असल्याने ते आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात, त्यामुळे खाज येण्याची समस्या दूर होण्यास मदत होते. त्यासाठी लसणाच्या सालीचे पाणी खाज होत असलेल्या भागात लावावे.

जर तुम्हाला अस्थमाचा त्रास असेल तर तुम्ही लसणाच्या सालीला व्यवस्थित बारीक करा आणि त्यात मध मिक्स करुन सकाळी-संध्याकाळी त्याचे सेवन करा.

- Advertisement -

Ultimate Garlic Peeling Trick -- How to Peel 20 Cloves in 20 Seconds! -  YouTube

लसणाची साल केसांसाठीही खूप फायदेशीर मानली जाते. डोक्यात कोंड्याची समस्या असल्यास केसांमध्ये पाणी किंवा लसणाच्या सालीची पेस्ट लावा, कोंडा आणि उवा दूर होतील. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही लसणाच्या सालींचे पाणी उकळून ते केसांना लावू शकता.

पायाची सूजही लसणाच्या सालीने कमी होते. यासाठी लसणाची साल पाण्यात उकळून त्यात पाय बुडवा. 

 


हेही वाचा :

न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरचा 3:2:1 फॉर्म्युला वापरा, वजन कमी करा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -