लसूण आरोग्यासाठी फायदेशीर असते. भारतीय किचनमध्ये याचा वापर मसाल्याच्या रुपात केला जातो. काही घरांमध्ये लसणाची चटणी बनवली जाते. ज्याची चव अत्यंत टेस्टी असते. (garlic tea health benefits)
काही लोक सकाळी उपाशी पोट लसूण खाल्ली जाते. त्यामुळे शरिराच्या काही समस्या दूर होतात. मात्र तुम्ही कधी लसणाच्या चहाबद्दल ऐकले आहे का? खरंतर लसणाची चहा पौष्टिक गुणांनी भरपूर असते. त्यामुळे काही प्रकारचे फायदे होऊ शकतात. अशातच जाणून घेऊयात लसणाच्या चहाचे फायदे काय आहेत आणि कृती.
लसणाच्या चहाचे फायदे
-लसणाच्या चहामध्ये अँन्टीऑक्सीडेंट, अँन्टीसेप्टिक आणि अँन्टीफंगल गुण असतात. जे बॅक्टेरियाच्या संक्रमणापासून दूर ठेवण्यास मदत करतात. त्याचसोबत रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते.
-या चहामध्ये एंजाइम असतात जे पचनासाठी प्रोत्साहन देतात. यामध्ये असलेले पोषक तत्त्व अपचनाची समस्या दूर करण्यास मदत कतात.
-लसणाच्या चहात अँन्टी कॅन्सर गुण असतात. जे काही प्रकारचे कॅन्सर रोखण्यास मदत करतात. एका रिसर्चनुसार, जी लोक लसणाची चहा पितात त्यांच्यामध्ये पोट आणि स्तनाचा कॅन्सरचा धोका कमी होतो.
-लसणाची चहा वजन कमी करण्यास मदत करू शकते. ही चहा प्यायल्याने मेटाबॉलिज्म बूस्ट होतो आणि भूक ही लागत नाही. त्यामुळे अधिक खाण्यापासून दूर रहा. अशा प्रकारे वजन कमी होण्यास मदत होईल.
अशा प्रकारे तयार करा लसणाची चहा
साहित्य-
2-3 लसणाच्या पाकळ्या, 2 कप पाणी, स्वादासाठी लिंबू किंवा मध
कृती-
-लसणाच्या पाकळ्यांची पेस्ट तयार करून घ्या.
-आता एका पॅनमध्ये पाणी उकळा.
-जेव्हा पाणी उकळले जाईल तेव्हा त्यात लसणाची पेस्ट टाका.
-त्यानंतर 15-20 मिनिटांपर्यंत उकळवा.
-आता त्यात मध आणि लिंबूचा रस मिक्स करू शकतो.
-जेव्हा ते कोमट होईल तेव्हा ते प्या.
हेही वाचा- रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ‘ब्लॅक टी’ आहे गुणकारी