घरलाईफस्टाईलगटारी स्पेशल: चिकन करी

गटारी स्पेशल: चिकन करी

Subscribe

महाराष्ट्रात २० जुलैपासून श्रावण महिना सुरू होणार आहे. या महिन्यापासून पुढे सणांची रेलचेल सुरू होते. त्यामुळे मांसाहार खाण्यावर बंदी असते. त्यामुळे १९ जुलै हा शेवटचा रविवार असणार आहे ज्यादिवशी तुम्ही मांसाहारावर ताव मारु शकता. त्यामुळे तुमच्यासाठी आज खास बेत असेल. मग आज चिकनचा बेत करणारच असाल तर चिकन करीची रेसिपीज नक्की करुन पहा.

साहित्य

- Advertisement -
  • चिकन – पाव किलो
    (बोन्ससकट आणि हलाल मिट असेल तर उत्तम)
  • ३ कांदे
  • ८-१० लसणाच्या पाकळ्या
  • १/२ इंच आलं
  • ३ मोठे चमचे सुकं खोबरं
  • प्रत्येकी २/३ लवंगा
  • काळी मिरी
  • १/२ इंच दालचिनीचा तुकडा
  • २ चमचे गरम मसाला
  • २ चमचे लाल तिखट
  • २ चमचे काजुची पेस्ट
  • १ लहान टोमॅटो
  • जीरे, तेल, हळद, मीठ – अंदाजाने
    आवडीनुसार कोथिंबीर

वाटणकरण्याकरता

पॅनमध्ये अगदी थोडं तेल घालुन लवंगा, काळी मिरी, दालचिनीचा तुकडा टाकुन परतुन घ्या. त्याच पॅनमध्ये आधीचा खडा मसाला न काढता कापलेल्या कांदयाच्या २/३ कांदा परतुन घ्यावा. कांदा ब्राऊन कलरचा झाला की त्यात सुकं खोबरं, ४-५ लसणीच्या पाकळ्या, आलं बारीक तुकडे करुन सगळं ब्राऊन होईपर्यंत परतुन घ्या. हे सगळ गार झालं की लागेल तसं पाणी टाकुन मिक्सरमधुन बारीक वाटण करुन घ्या.

- Advertisement -

पुढील कृती

चिकन स्वच्छ धुवुन घ्यावं. नंतर कुकरमध्ये २ चमचे तेल टाकून ते गरम झाल्यावर जीरं टाकावं. त्यात ४-५ लसणीच्या पाकळ्या बारीक चिरुन घालाव्यात. लसूण थोडा परतला की कापलेल्या कांद्याच्या अर्धा कांदा टाकुन परतावं. टोमॅटो हवा असेल तर कांदा परतला गेला की त्यात घालुन परतावं. थोडी हळद, १/२ चमचा लाल तिखट घालुन मिनिट्भर परतावं. मग त्यात धुतलेलं चिकन घालुन ते थोडे परतावं. त्यात अगदी थोडं मीठ घाला.

नंतर कुकरचं झाकण लावुन ३ शिट्ट्या होऊ द्याव्या. कुकर गार झाल्यावर चिकन शिजलेलं असेल आणि त्यात सुप पण तयार झालं असेल. आता कढईमध्ये २-३ मोठे डाव तेल घालुन गरम झाल्यावर जीरे घाला. नंतर वाटण घाला. हे वाटण तेलात खुप चांगलं परतुन घ्या. साधारण १२-१५ मिनिटं तरी परता. मग त्यात काजुची पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, हळद घालुन अजुन १-२ मिनिटं परतुन घ्या. त्यानंतर कुकर मधलं चिकन आणि सुप घाला. करी किती घट्ट किंवा पातळ हवी त्याप्रमाणात पाणी घाला. चवीप्रमाणे मीठ घाला, एक उकळी आली की चवीप्रमाणे कोथिंबीर घाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -