Monday, January 20, 2025
HomeमानिनीFashionHair Care Tips : केसांसाठी उत्तम आहे जिरेनियम तेल

Hair Care Tips : केसांसाठी उत्तम आहे जिरेनियम तेल

Subscribe

जिरेनियम तेल हे गुलाब किंवा पांढरी फुले येणाऱ्या एका फुलझाडापासून बनते. या तेलाचे अनेक फायदे देखील आहेत. त्वचेच्या आजरा पासून ते केसांसाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या तेलाचा सुगंध गुलाबासारखा असतो. आजकाल बदलत्या वातावरणामुळे केसांच्या अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. केस गळती किंवा केस खराब होणे आता ही खूप सामान्य समस्या झाली आहे. आपण अनेक घरगुती उपाय करतो परंतु या समस्या कमी होत नाही. त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात, केसांची समस्या दूर करण्यासाठी जिरेनियम तेलाचा कसा करायचा उपयोग.

केसांसाठी जिरेनियम तेल का वापरले जाते ?

केसांच्या वाढीसाठी

जर तुमचे केस वाढत नसतील तर तुम्ही जिरेनियम तेलाचा वापर करू शकता. हे तेल केसांच्या मुळांना पोषण देते आणि केसांची वाढ होण्यास मदत करते.

डैंड्रफ कमी करण्यासाठी

वाढत्या प्रदूषणामुळे डैंड्रफची समस्या निर्माण होऊ शकते. जिरेनियम तेलामुळे टाळूतील कोरडेपणा कमी होतो. ज्यामुळे डैंड्रफची समस्या कमी होऊ शकते.

केसांची चमक वाढवण्यासाठी

केसांची चमक वाढवण्यासाठी जिरेनियम तेल उत्तम आहे. हे तेल नियमित वापरल्याने केस नैसर्गिकरित्या चमकतात .

जिरेनियम तेलाचा वापर कसा करायचा

  • काही थेंब जिरेनियम तेल नारळ तेल किंवा बदाम तेलामध्ये मिसळून डोक्यावर हलक्या हाताने मालिश करा. 30-45 मिनिटे ठेवून नंतर केस धुवावे.
  • दोन चमचे नारळाच्या तेलात थोडे जेरेनियम तेल मिसळा आणि केसांना लावा. आंघोळीच्या एक किंवा दोन तास आधी हा मसाज करू शकता यानंतर, शैम्पूने केस धुवा. हे काही दिवस केल्याने केस मजबूत होतील.
  • तुम्ही जिरेनियम तेलामध्ये टी ट्री तेल मिसळू शकता.
  • या काही पद्धतीने तुम्ही जिरेनियम तेल केसांना लावू शकता.

हेही वाचा : Hair Care Tips : केस झटपट वाढवण्यासाठी ट्राय करा रोझमेरी तेल


Edited By : Prachi Manjrekar

Manini