Wednesday, January 1, 2025
HomeमानिनीFashionFashion Tips: स्कार्फने मिळवा स्टयलिश लूक

Fashion Tips: स्कार्फने मिळवा स्टयलिश लूक

Subscribe

प्रत्येक ऋतूमध्ये आपण आपल्या फॅशनमध्ये बदल करत असतो. स्टाइल, ट्रेंड, रंग यांना आपण फॉलो करतो. हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅशनला जास्त प्राधान्य दिले जाते. फॅशनमुळे आपले व्यक्तिमत्व देखील हायलाइट होते. ऑफिस, पार्टी, कॉलेज या सर्व ठिकाणी प्रत्येक तरुणीला स्टयलिश दिसावं असं वाटतं असत. त्यासाठी त्या वेगवेगळ्या फॅशन स्टाइल एक्सपेरिमेंट करत असतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का ? तुम्ही स्कर्फ घालून देखील स्टयलिश दिसू शकता.

बऱ्याच तरुणी आपल्या आऊटफिटवर स्कार्फ कॅरी करतात. पूर्वीच्या काळी स्कार्फचे मर्यादित पर्याय होते परंतु आता, तुम्हाला मार्केट किंवा ऑनलाइन स्कार्फचे असंख्य प्रकार रंग मिळतील. तुम्ही तुमच्या आऊटफिट किंवा आवडीनुसार स्कार्फची निवड करू शकता. काही ॲक्सेसरीजसह स्कार्फ स्टाइल करू शकता.

- Advertisement -

स्कार्फ बांधण्याच्या पद्धती

क्लासी लूकसाठी तुम्ही स्कार्फ अर्धा दुमडून स्टाइल करू शकता. तसेच स्कार्फची गाठ बांधून नेकलेससारखा देखील वापरू शकता. हेअरबॅण्डप्रमाणे स्टाइल करून तुम्ही हा हटके लूक मिळवू शकता.

स्कार्फची निवड

स्कार्फची निवड तुम्ही तुमच्या आवडी किंवा आऊटफिटप्रमाणे देखील करू शकता. प्रिंटेड, फ्लोरल, सिम्पल यांपैकी कोणत्याही स्कार्फची निवड तुम्ही निश्चितपणे करू शकता. तसेच स्कार्फच्या फॅब्रिकपासून ते रंग आणि प्रिंटपर्यंत सर्व गोष्टी नीट तपासून घ्या. सिल्क आणि शिफॉनसारखे स्कार्फ तुमच्या लूकची शोभा वाढवते. एथनिक किंवा फॉर्मल लूकसाठी सिल्क स्कार्फ उत्तम आहे.

- Advertisement -

फॅब्रिक

स्कार्फ खरेदी करताना फॅब्रिकपासून ते रंग आणि प्रिंटपर्यंत अनेक गोष्टी तपासणे देखील गरजेचं आहे. या तुमच्या लूकमध्ये शोभा वाढवतात, तर तुम्ही कॅज्युअलमध्ये प्रिंटेड स्कार्फ स्टाईल करू शकता. हिवाळ्यासाठी वूलन स्कार्फ उत्तम आहे.

स्टयलिश लूक

स्टयलिश लूकसाठी तुम्ही हा स्कार्फ तुमच्या बॅगेला देखील लावू शकता. हल्ली बऱ्याच तरुणी आपल्याला बॅगला किंवा पर्सला स्कार्फ लावतात. हे खूप ट्रेंडी देखील वाटते. प्लेन ड्रेसवर रंगीत स्कार्फ सुंदर दिसेल. फ्लोरल किंवा रंगीत ड्रेसवर प्लेन स्कार्फ आकर्षक वाटेल.

हेही वाचा :  Fashion Trends : स्टायलिश आणि स्लिम लूकसाठी हायवेस्ट जीन्स


Edited By : Prachi Manjrekar

 

- Advertisment -

Manini