हिवाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. जास्त थंडीमुळे हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. त्यामुळे हिवाळ्यात अनेकजण आपल्या खाण्या-पिण्याप्रमाणेच त्वचेची काळजी घेणारे अनेक उत्पादन वापरतात. मात्र, त्याचाही फारसा परिणाम पाहायला मिळत नाही. यावर उपाय म्हणून घरच्या घरी चेहरा तजेलदार दिसण्यासाठी कच्च्या दुधाचा उपयोग तुम्ही करु शकता.
कच्च्या दूधामध्ये पोटॅशिअम,मॅग्नेशिअम,सेलेनियम आणि लॅक्टिक अॅसिड,प्रोटीन,कॅल्शिअम,व्हिटॅमिन असे अनेक गुण आहेत. हे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते. कच्चे दूध त्वचेला ग्लोइंग आणि तजेलदार करण्यास मदत करते.
कच्च्या दूधाचे फायदे
सर्वांत गुणकारी मॉइश्चरायझर म्हणून कच्च्या दूधाला खूप उपयुक्त मानले जाते. कच्च्या दूधाचा मॉइश्चरायझर म्हणून वापर करण्यासाठी प्रथम 3 ते 4 चमचे कच्चे दूध घ्या. त्यात अर्धा चमचा ग्लिसरीन मिसळून ते कॉटन बॉलच्या साहाय्याने चेहरा, मान आणि ओठांवर लावा. त्यानंतर 20 मिनिटांनी चेहरा हा स्वच्छ पाण्याने धुऊन टाका.
कच्च्या दूधाचे फेस मास्क
कच्च्या दूधापासून फेस मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम 3 चमचे कच्चे दूध घ्या. त्यात चिमूटभर मुलतानी माती मिसळा आणि चेहरा आणि मानेला लावा. कमीतकमी 20 मिनिटे लावून चेहरा पाण्याने धुवून टाका.
हेही वाचा :