Thursday, January 23, 2025
Homeमानिनीरेल्वेत प्रवास करताना आजारी पडलात तर अशी मिळवा मदत

रेल्वेत प्रवास करताना आजारी पडलात तर अशी मिळवा मदत

Subscribe

भारतीय रेल्वेमध्ये दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. अशावेळी प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेष करून लांब पल्ल्याच्या गाडीत प्रवास करताना अनेक जणांना अस्वथ वाटू लागते किंवा त्याची तब्येत अचानक बिघडते. अशावेळी तुम्ही धावत्या रेल्वेत वैद्यकीय मदत मिळवू शकता. प्रत्येक रेल्वेमध्ये एक डॉक्टर नक्कीच उपस्थित असतो. अशावेळी तुम्ही काही स्टेप्सद्वारे उपस्थित डॉक्टरांची मदत घेऊ शकता आणि वेळेवर उपचार मिळू शकता.

डॉक्टरांशी कसा संपर्क साधाल ?

काही रेल्वेमध्ये विशेषतः लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये डॉक्टर उपस्थित असतात. अशावेळी तुम्ही टीटीईशी संपर्क साधून डॉक्टरांची मदत घेऊ शकता. या अंतर्गत डॉक्टर तुम्हाला प्रथमोपचार आणि आवश्यक औषधे देऊ शकतील.

रेल्वे हेल्पलाइनची मदत घ्या-

रेल्वेने प्रवाशांसाठी 24 तास हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. भारतीय रेल्वेचा हेल्पलाईन क्रमांक 139 आहे. 139 क्रमांकावर कॉल करून किंवा SMS पाठवून ट्रेनसंबधी माहिती मिळविता येते. 139 वर कॉल करून प्रवाशांना रेल्वेशी संबंधित चौकशी, पीएनआर स्थिती, तिकीट उपलब्धता, ट्रेन टाइम आणि प्रस्थानाशी संबंधित माहिती मिळविता येते. 139 क्रमांकावर फोन करून प्रवाशांना सुरक्षा, वैद्यकीय आणीबाणी, रेल्वे अपघातासंबंधित माहिती, रेल्वे संबंधित तक्रारी, सतर्कता, मालाची वाहतूक, पार्सलसंबंधित माहिती स्थानकावरील दक्षता आणि भष्ट्राचाऱ्याच्या तक्रारी अधिकाऱ्यांशी बोलून मदत घेता येते.

139 क्रमांकावर प्रवाशांना 24 तास 7 दिवस केव्हाही माहिती मिळविता येते. 139 क्रमांकावर कॉल करण्यासाठी प्रवासी इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टमचा पर्याय निवडू शकता. याशिवाय रेल्वे सुरक्षा हेल्पलाईन क्रमांक 182 क्रमांकावरूनही मदत मिळू शकते

100 रुपये भरून मदत मिळते – ही सुविधा सर्व प्रकारच्या पॅसेंजर, मेल आणि एक्सप्रेस ट्रेनमध्ये उपलध असते. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशाला रेल्वे हेल्पलाईन टीटीई किंवा गार्डला कळवावे लागेल, टीटीई ताबडतोब कंट्रोल रूमला निरोप पाठवून पुढील स्थानकावर डॉक्टरांची मागणी केली जाते. ट्रेन पुढच्या स्थानकाला पोहचल्यावर रेल्वेचे डॉक्टर प्रवाशांची तपासणी करतील. या सुविधेअंतर्गत डॉक्टरांचे शुल्क 100 रुपये आहे . मात्र एक लक्षात घ्या औषधांचा खर्च वेगळा द्यावा लागतो. यानंतर कर्मचारी प्रवाशांकडून 100 रुपये घेऊन स्लिप बनवून देतात. स्थानकावर डॉक्टर उपलब्ध नसल्यास प्रवासाच्या संमतीनंतर त्याला स्थानकावर उतरवून जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात येते. मात्र, प्रवासी किरकोळ अडचणी आल्या तरी डॉक्टरांना फोन करता असतात. त्यामुळे रेल्वे शुल्क वाढवू शकते.

 

 

 


हेही वाचा : इअरफोन की हेडफोन, नक्की काय वापरायचे?

 

Manini