बहुतांश महिला ऑफिसला जाताना आपला लूक व्यवस्थितीत दिसतोय ना याची पुरेपूर काळजी घेतात. याउलट काही महिला असे काहीच करत नाही. त्यांना असे वाटते की, लोक आपल्याकडे नव्हे तर कामाला नोटीस करतात. पण हे पूर्णपणे योग्य नाही. तुम्ही तुमच्या प्रोफेशननुसार तयार होऊन जायला पाहिजे. जेणेकरून तुमचे व्यक्तीमत्त्व इतरांसमोर खुलून दिसेल. जर तुम्ही सुद्धा वर्किंग असाल तर ऑफिससाठी तयारी करताना पुढील काही गोष्टींकडे जरूर लक्ष द्यायला पाहिजे.
-ऑफिससाठी जे काही कपडे घालणार आहात ते इस्री केलेले असावेत
-साडी नेसायची असेल तर ती व्यवस्थितीत असावी त्याचसोबत त्याचा ब्लाउज ही अधिक फॅशनेबल नसावा
-इनरवेअ सुद्धा तुमच्या कपड्यांना सूट करणारे असावेत
-केस व्यवस्थितीत विंचरावीत
-कधीकधी विविध हेअरस्टाइल करून ऑफिसला जावे
-ऑफिसला जाताना नेहमीच एखादा लाइट स्मेल असणारा परफ्युम किंवा डिओड्रंट लावून जावे
-उन्हाळ्यात घाम येणे सहाजिकच आहे. त्यामुळे टिश्यू पेपर अथवा रुमान नक्कीच सोबत ठेवा
-ऑफिसला जाण्यासाठी तयारी करताना आपल्या कपड्यांना मॅच होतील असे कानातले, ब्रेसलेट नक्कीच घाला
-वेळोवेळी थ्रेडिंग, मेनिक्योर, पेडीक्योर आणि फेशिअल करा
-हलका मेकअप ही करा. पावसाळ्यात वॉटरप्रुफ मेकअपचा वापर करू शकता
-ऑफिससाठी घातले जाणाऱ्या कपड्यांचे गळे अधिक डीप नको
-ऑफिससाठी जी बॅग कॅरी करता ती कंम्फर्टेबल असावी
हेही वाचा- वर्किंग वुमेन्ससाठी ‘या’ ब्लॉऊज डिझाइन्स आहेत Perfect