हिवाळा सुरू झाला की सांधेदुखी,अंगदुखीच्या समस्येबरोबरच पायदुखीने अनेकजण हैराण होतात. थंडीच्या दिवसात शरीराची हालचाल मंदावते. शरीराला फारला घाम येत नाही. यामुळे स्नायू आखडतात. रक्ताभिसरण प्रक्रियाही मंदावते यामुळेच अंगदुखी, पायदुखीसारखे दुखणे सुरु होते. पण प्रत्येकवेळी औषध-गोळ्या खाण्यापेक्षा काही घरगुती उपायांनी देखील तुम्ही या दुखण्यांपासून आराम मिळवू शकता.
घरगुती उपायांनी मिळवा पायदुखीपासून आराम
- मीठाचे पाणी
गरम पाण्यात मीठ टाकून त्यात पाय शेकावे. या पाण्यात 10 ते 15 मिनिट पाय शेकावेत. नंतर पायांना दहा मिनिटे मोहरीच्या तेलाने मालिश करावी त्यामुळे लगेच आराम मिळतो. पायदुखीचा त्रास कमी होतो.
- मोहरीचे तेल
हिवाळ्यात पाय दुखण्याची तक्रार ही सर्वच वयोगटातील व्यक्तींना असते. यासाठी पायांना मोहरीच्या तेलाने मालिश करा. पण मोहरीचे तेल गरम करताना त्यात लसूण ठेचून टाकावा. तेल गरम झाल्यावर पायांना त्याने मालिश करावे. यामुळे पायात रक्ताभिसरण प्रक्रिया नियमित होते. थंडीमुळे आखडलेल्या स्नायू सैल होतात. रक्त प्रवाह सुरळीत होतो. पायदुखी कमी होते.
- आईस पॅक्स
पायदुखी पासून, सांधेदुखीपासून त्रस्त असाल तर दुखऱ्या ठिकाणी आई, पॅक किंवा गरम पाण्याचा शेक घेऊ शकता. यामुळे सूज कमी होऊन दुखण्यापासून दिलासा मिळतो.
- व्यायाम
हिवाळ्यात व्यायाम करणे गरजेचे असते. यामुळे स्नायूंची हालचाल होते. रक्ताभिसरण नियमित होते. यामुळे दुखणे कमी होते.
- डाएट
सांधेदुखीचा त्रास असेल तर डाएटकडे लक्ष द्यावे. प्रामुख्याने व्हिटामीन डी ची कमतरता असेल तर सांधेदुखीचा त्रास होतो. पायदुखीही बळावते. यामुळे डाएटकडे लक्ष द्यावे. ताज्या भाज्या, फळ , मासे, सुका मेवाचा समावेश करावा.
हेही वाचा :