बऱ्याच लोकांना ऍसिडिटीची समस्या असते आणि ही खूप सामान्य समस्या आहे. ऍसिडिटीमुळे छातीत जळजळ, अपचन, ओहोटी, अन्ननलिकेत वेदना होणे या समस्यांना सामाेरे जावे लागते. आज आपण जाणून घेऊयात कोणत्या उपायांनी ऍसिडीटी दूर करू शकतो.
ऍसिडीटी होण्याची कारणे
खाण्याच्या चुकीच्या सवयी
जास्त प्रमाणात अन्न खाल्ल्याने किंवा खूप लवकर खाल्ल्याने पोटावर ताण येतो, ज्यामुळे अपचन होते आणि ऍसिडचे उत्पादन वाढते. जेव्हा पोट ओव्हरलोड होते, तेव्हा ते अन्न तोडण्यासाठी जास्त प्रमाणात ऍसिड तयार करते, त्यामुळे ऍसिडीटी होते.
धूम्रपान आणि मद्यपान
मद्यपान किंवा धूम्रपान केल्यामुळे ऍसिडीटी अजून वाढते. तसेच इतर समस्यांना देखील सामोरे जावे लागते.
खराब जीवनशैली
खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे शरीरामध्ये खराब युरिक अॅसिड वाढू लागते आणि यामुळे भयंकर सांधेदुखीची समस्या निर्माण होते.
ऍसिडीटी दूर करण्याचे उपाय
गरम पाणी प्या
सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्यायल्याने पचनसंस्था सुधारते आणि ऍसिडीटी कमी होते.
कोमट दुधात तूप मिसळून घ्या
तूपामध्ये पचनशक्ती सुधारण्याचे गुणधर्म असतात. झोपण्यापूर्वी कोमट दुधात एक चमचा तूप मिसळून पिल्यास फायदा होतो.
लिंबूपाणी
लिंबूपाण्यामध्ये अँटिऑक्सिडनटचे गुणधर्म असतात जे ऍसिडी कमी करण्यास आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. लिंबू शरीरातील आम्ल संतुलित ठेवण्यास मदत करते.
जिरे किंवा सौंफ चावून खा
जेवणानंतर जिरे किंवा सौंफ चावून खाल्ल्यास पचन सुधारते आणि ऍसिडीटी नियंत्रणात राहते.
हिंग आणि कोमट पाणी
एका चमचा हिंग कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने गॅस आणि ऍसिडिटी दूर होते.
हे घरगुती उपाय केल्याने ऍसिडिटीचा त्रास कमी होईल आणि जर वारंवार त्रास होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हेही वाचा : Kitchen Tips : भाजीच्या ग्रेव्हीमध्ये दही का आणि केव्हा मिसळावे ?
Edited By : Prachi Manjrekar