डोके दुखी अनेकांसाठी एक कॉमन प्रॉब्लम आहे. डोकं दुखण्याची बरीच कारणं असतात. जसे डोळ्यांची समस्या, सायनास, मासिक धर्म, मानसिक तणाव आणि उशीरा रात्रीपर्यंत जागणे या सर्व कारणांमुळे डोकेदुखी उद्भवते. मात्र काही घरगुती उपाय केल्यास डोके दुखी थांबते.
- Advertisement -
- गरम पाण्यात लिंबाचा रस घालून ते पाणी प्यायल्याने डोके दुखी थांबते. जर गॅस झाल्यामुळे डोकं दुखत असल्यास डोके दुखी त्वरित थांबते.
- नेहमी डोकं दुखत असेल तर सफरचंदावर मीठ लावून खाल्याने आराम मिळतो. त्यानंतर गरम पाणी किमवा दुधाचे सेवन केले पाहिजे. यामुळे डोकेदुखीची समस्या दूर होते.
- सर्दीमुळे डोकेदुखी होत असल्यास धणेपूड आणि साखरेचा घोळ तयार करुन त्याचे सेवन केल्याने फायदा होतो.
- लवंगांत थोडे मीठ मिसळून त्याची पावडर तयार करुन घ्यावे. डोकं दुखायला लागल्यावर कच्च्या दुधात ही पावडर मिसळून ही तयार झालेली पेस्ट डोक्यावर लावावी. यामुळे डोकं दुखी थांबते.
- निलगिरीच्या तेलाने डोक्याची मॉलिश केल्यास डोके दुखी थांबण्यास मदत होते.
- नारळाच्या तेलाने 20 मिनिटे डोक्याला मसाज केल्याने देखील डोके दुखी दूर होते.
- दररोज डोक दुखत असल्यास दररोज एक ग्लास गायीच्या दुधाचे सेवन करावे. यामुळे आराम मिळतो.
- गरमीमुळे डोकं दुखत असल्यास चंदन पावडरची पेस्ट तयार करुन डोक्याला लावल्याने आराम मिळतो.
- डोकं दुखत असल्यास एक लसूण पाकळी खाल्ल्याने आराम मिळतो.
हेही वाचा :