Saturday, March 22, 2025
HomeमानिनीHealth Tips : सीझनल एलर्जी अशी करा दूर

Health Tips : सीझनल एलर्जी अशी करा दूर

Subscribe

हल्ली बदलत्या हवामानमुळे किंवा प्रदूषणामुळे काही बदल झाल्यामुळे आपल्याला एलर्जी होत असते. आता एलर्जी होणे ही एक सामान्य समस्या झाली आहे. यामध्ये शिंका येण्यापासून ते डोळ्यांना खाज येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू शकतात. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी बरेच लोक औषधे घेतात. वारंवार औषधे घेणे आपल्या आरोग्यसाठी चांगले नाही. अशावेळी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकतात. तुम्ही काही हर्बल उपचार करू शकतात आज आपण जाणून घेऊयात सीझनल एलर्जी कशी दूर करायची.

आलं

जर तुम्हाला सीझनल एलर्जी झाली असेल तर अशावेळी आले खाणे चांगले मानले जाते. आल्यामध्ये केवळ एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म नसून अँटीहिस्टामाइन म्हणून कार्य करते. या सीझनल एलर्जी पासून दूर राहण्यासाठी आलं उत्तम आहे. आता आल्याचा तुकडा उकळवा आणि गाळून त्यात लिंबू आणि मध घालून प्या.

हळद

सीझनल एलर्जी झाल्यावर हळदीचे सेवन करणे खूप चांगले मानले जाते. यामध्ये एंटी-इंफ्लेमेटरी आणि एंटी-ऑक्सीडेंटचे गुणधर्म असतात जे एलर्जी दूर करायला मदत करते. तुम्ही प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी दूधासह एक चमचा हळद आणि मध घालून झोपण्याआधी घ्या.

पुदिन्याचा चहा

पुदिन्यामध्ये मेन्थाॅल असते, जे कंजेस्टंट म्हणून काम करते. जर तुमचं ऍलर्जीमुळे श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा तुमचे नाक बंद असेल तर पुदिन्याची चहा घ्या. यासाठी, ताजी किंवा वाळलेली पुदिन्याची पाने गरम पाण्यात १० मिनिटे भिजवा आणि नंतर ती गाळून प्या.

कॅमाेमाइल चहा

कॅमोमाइलमध्ये एंटी-इंफ्लेमेटरी प्रोपर्टीज असतात. जे सीजनल एलर्जी कमी करायला मदत करते. या चहाचे सेवन केल्याने डाेळयांची खाज किंवा नाक गळणे इत्यादी समस्या दूर हाेऊ शकतात.

हेही वाचा : Summer Diet : उन्हाळ्यात अवश्य खाव्यात या भाज्या, राहाल फिट आणि फाईन


Edited By : Prachi Manjrekar

Manini