आयुर्वेदानूसार तूप विविध गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. तूपात असे अनेक पोषक घटक आढळतात, जे शरीरासाठी आवश्यक असतात. तूपामध्ये निरोगी फॅट्स, व्हिटॅमिन A, K, D सारखे अनेक पोषक तत्वे असतात. साजूक तुपामुळे जशी पदार्थांची चव वाढते, तशीच शरीरासाठी तूपाचे अनेक प्रकार फायदेशीर ठरते. विशेषत: जेव्हा रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही तूपाने हातापायांच्या तळव्यांना मालिश केलीत तर विविध आजारांचा धोका टाळता येतो. त्यामुळे जाणून घेऊयात, झोपण्यापूर्वी हातापायांच्या तळव्यांना तूपाने मालिश कोणते फायदे होतात.
तूपाने मालिश करण्याचे फायदे –
- तूपामध्ये आरोग्यदायी फॅट्स आणि विविध विटामिन्स आढळतात. या पोषक घटकांमुळे हातापायांवर तूपाने मालिश केल्यावर रक्ताभिसरण होते. ज्यामुळे शरीराच्य प्रत्येक भागात रक्त सहज पोहोचते.
- हातापायांच्या तळव्यांना तूपाने मसाज केल्याने त्वचा मऊ होते. तूप त्वचेसाठी नॅचरल मॉईश्र्चरायझर म्हणून काम करते. दररोज झोपण्याआधी तूपाने मालिश केल्याने हात पाय मऊ होतात.
- हातापायांच्या तळव्यांना तूपाने मसाज केल्याने तणाव आणि थकवा दूर होते. तसेच रात्री झोपण्यापूर्वी हातापायांना तूपाने मालिश केल्याने शांत झोप लागते.
- रात्री झोपण्यापूर्वी हातापायांच्या तळव्यांना तूपाने रक्तदाब नियंत्रणात राहते. त्यामुळे तुम्हाला जर वारंवार रक्तदाब वाढीची समस्या जाणवत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी तूपाने तळव्यांना मालिश करा.
- आयुर्वेदानूसार, तूपाच्या मालिशने वात दोष दूर होतो. त्यामुळे तुम्हाला जर वातदोषाचा त्रास असेल तर तूपाने मालिश करा.
- रात्री झोपण्यापूर्वी हातापायांच्या तळव्यांना तूपाने मालिश केल्यास त्वचेचे आरोग्य उत्तम राहते. यामुळे त्वचा हायड्रेट राहते.
तूपाने मालिश कशी कराल ?
- तळव्यांना तूपाने मालिश करण्यासाठी तूप हलके गरम करा.
- थोडे थंड झाल्यावर हातापायांची हलक्या हाताने मालिश करा.
- 10 मिनीटे तूप तळव्यांवरच असुद्या.
- फक्त भेसळयुक्त तूप नसेल याची खात्री करावी. शुद्ध तुपानेच तळव्यांची मालिश करावी.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde