रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी खा ‘सुंठ-हळदीच्या गोळ्या’

सुंठ-हळदीच्या गोळ्याबद्दल जाणून घ्या.

ginger-turmeric balls to boost immunity
रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी खा 'सुंठ-हळदीच्या गोळ्या'

कोरोनाच्या परिस्थितीत रोगप्रतिकार शक्ती वाढवणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे अनेक जण रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. दरम्यान सुंठ-हळदीच्या गोळ्या देखील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे आज आपण सुंठ-हळदीच्या गोळ्या कशा तयार करतात हे जाणून घेणार आहोत. तसेच त्याचे सेवन देखील कशाप्रकारे करायचे हे देखील माहित करून घेणार आहोत.

साहित्य

सुंठ पावडर, हळद पावडर , गूळ,तूप

कृती

सुंठ पावडर जेवढी घ्याल तेवढाच गूळ घ्या. एक छोटी वाटी सुंठ पावडर घ्या. तसेच एक छोटी वाटी बारीक किसलेला गूळ घ्या. मग त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात हळद पावडर, सुंठ आणि गूळ घालून एकदा फिरवून घ्या. त्यानंतर बारीक झालेल्या मिश्रणात तूप घाला आणि पुन्हा एकदा फिरवून घ्या. मिश्रणाचे गोळे तयार करता येतील अशा प्रमाणात तूप घाला. मग मिश्रण तयार झाल्यानंतर छोटे-छोटे गोळे तयार करा. या गोळ्या फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही. एका डब्यात गोळ्या बंद करून ठेवा आणि रोज रात्री कोमट पाण्यासोबत किंवा दुधासोबत या छोट्या गोळीचे सेवन करा.