Saturday, January 4, 2025
HomeमानिनीChristmas Gift Ideas : ख्रिसमसच्या निमित्ताने बच्चे कंपनीला हे गिफ्ट द्या

Christmas Gift Ideas : ख्रिसमसच्या निमित्ताने बच्चे कंपनीला हे गिफ्ट द्या

Subscribe

दरवर्षी 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस हा सण साजरा केला जातो. परदेशात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. परंतु भारतातही आता ख्रिसमसची क्रेझ वाढत चाली आहे. परदेशा प्रमाणे भारतातही आता थाटामाटात ख्रिसमसचे आयोजन केले जाते पार्टी घर सजावट इत्यादी गोष्टी केल्या जातात मुले देखील ख्रिसमसची आतुरतेने वाट पाहात असतात. मुलांना ख्रिसमस आवडण्या मागचं कारण म्हणजे या दिवशी मुलांना भेटवस्तू मिळतात. बऱ्याच शाळांमध्ये ख्रिसमसच्या निमित्ताने खास कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमात मुलांना भेटवस्तू देखील दिले जाते. तुम्ही तुमच्या मुलांसोबत ख्रिसमस साजरा करत असाल आणि तुम्हाला काही खास भेटवस्तू द्याची असेल तर तुम्ही काही बेस्ट गिफ्ट्स देऊ शकता. आज आपण जाणून घेऊयात, ख्रिसमसच्या निमित्ताने बच्चे कंपनीला कोणते गिफ्टस देऊ शकतो.

सॉफ्ट टॉयज्

जर तुमच्या घरी लहान मुलं असतील तर तुम्ही या ख्रिसमसला त्यांना सॉफ्ट टॉयज् देऊ शकता बऱ्याच मुलांना सॉफ्ट टॉयज् खूप आवडतात. ते या सॉफ्ट टॉयज्शी खेळतात, बोलतात. मुलांसाठी सॉफ्ट टॉयज् योग्य भेट आहे.

- Advertisement -

ख्रिसमस गिफ्ट आयडियाज

2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना तुम्ही ड्रॉइनिंग बूक, किंवा गोष्टीची पुस्तके, रंगीत पुस्तके भेट म्हणून देऊ शकता. तुमच्या मुलांचे वय ३ ते ५ असेल तर तुम्ही बिल्डिंग ब्लॉक्स पझ्झल रंग भरणारी पुस्तके असं काहीतरी भेट म्हणून देऊ शकता.

6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी

या मुलांच्या वयानुसार तुम्ही त्यांना कादंबरी किंवा पुस्तक देऊ शकता. याशिवाय बोर्ड गेम, कोडी, सॉकर बॉल, बास्केटबॉल किंवा इतर गोष्टी देखील देऊ शकता.

- Advertisement -

13 ते 17 वर्षे वयोगटातील मुले

जर तुमच्या मुलाचे वय 13 ते 17 वर्षांच्या दरम्यान असेल तर तुम्ही त्याला हेडफोन्स, पोर्टेबल स्पीकर किंवा टॅबलेट भेट देऊ शकता. याशिवाय कपडे किंवा ॲक्सेसरीजचाही पर्याय आहे. तसेच तुम्ही त्यांच्या पंसतीनुसार स्पोर्ट्स गियर आणि स्केचबुक, पेंटिंग किंवा ड्रॉइंग टूल देखील देऊ शकता.

हेही वाचा : Parenting Tips : मुलांच्या भवितव्यासाठी पालकांनी बदलायला हव्यात या सवयी


Edited By : Prachi Manjrekar

- Advertisment -

Manini