जीन्स हा आपल्या कपड्यांच्या वॉर्डरोबमधील एक आवश्यक आणि बहुपयोगी घटक आहे. स्टाइल, कम्फर्टच्या बाबतीत जीन्स हा सर्वोत्तम पर्याय आहे. कोणत्याही प्रसंगासाठी किंवा मित्रांसोबत फिरायला जाणे असो, ऑफिस कॅज्युअल लूकसाठी किंवा साध्या डेली आउटफिटसाठी आपण जीन्सची निवड करतो. हल्ली जीन्सचे असंख्य प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. आपण आपल्या आवडीनुसार या जीन्सची निवड करतो त्यांना स्टाइल करतो.
बऱ्याचवेळा जीन्स जुनी झाल्यावर आपण ती घालत नाही ती अशीच पडून राहते अशावेळी तुम्ही या जुन्या जीन्सला न्यू लूक देऊ शकता. बऱ्याचवेळा आपल्या कळत नाही, आपण कशाप्रकारे डेनिम जीन्सला न्यू लूक देऊ शकतो. आज आपण जाणून घेऊयात डेनिम जीन्सला घरीच कसा न्यू लूक द्याचा.
जुन्या जीन्सला रिक्रिएट करण्याची पद्धत
टोन जीन्स
तुम्ही जुन्या जीन्सला सहजपणे रिक्रिएट करू शकता. डेनिम जीन्स रिक्रिएट करण्यासाठी तुम्ही आधी डेनिम जीन्स घ्या. त्यानंतर त्याला तुम्हाला आवडेल तिथे टोन करा. अशा पद्धतीने तुम्हाला न्यू लूक मिळेल.
स्पार्कल जीन्स
स्पार्कल जीन्स तुम्हाला मार्केटमध्ये किंवा ऑनलाइन 1००० किंवा 2००० पर्यत मिळेल. ही स्पार्कल जीन्सला घरी देखील बनवू शकता. यासाठी एक ग्लू घ्या. तो ग्लू जीन्सला पिनच्या साहाय्याने पसरवा. तुम्ही ज्या भागात ग्लू लावलं त्या भागात तुम्ही मोती देखील लावू शकता. ही जीन्स तुम्ही पार्टीला देखील घालू शकता.
डायमंड
या जीन्सला डायमंड्स लावून देखील स्टाइल करू शकता. डायमंड लावल्यामुळे तुम्हाला एक क्लासिक आणि कूल लूक मिळेल. तुमची जुनी डेनिम जीन्स या डायमंडमुळे अजून सुंदर आणि आकर्षक दिसेल.
अशाप्रकारे तुम्ही डेनिम जीन्सला घरीच न्यू लूक देऊ शकता.
हेही वाचा : Fashion Tips : डिनर डेटसाठी परफ्केट लॉन्ग ड्रेसेस
Edited By : Prachi Manjrekar