टिफिनमध्ये पोळी-भाजी, खिचडी असे तेच-तेच पदार्थ खाऊन मुलांना कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही मुलांसाठी पौष्टिक, सोप्पे पदार्थ घरच्या-घरी बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशीच पौष्टिक आणि सोप्पी रेसिपी कशी करणारची हे सांगणार आहोत.
साहित्य :
- 2 उकडलेले बटाटे
- 4-5 बारीक चिरलेल्या मिरच्या
- 1 चमचा लाल तिखट
- 1/2 चमचा हळद
- 2 बारीक चिरेलेले कांदे
- 8-9 ब्रेड स्लाईस
- 1 वाटी गव्हाचे पीठ
- 2 चमचे रवा
- टोमॅटो सॉस
- कोथिंबीर
- चवीनुसार मीठ
कृती :
- सर्वप्रथम एका बाउलमध्ये उकडलेले बटाटे, कांदा, मिरची, लाल तिखट, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घाला.
- आता ब्रेड स्लाईसला वाटीच्या मदतीने गोल आकार द्या आणि त्याच्या दोन्ही बाजूला टोमॅटो सॉस लावा.
- आता ब्रेड स्लाईसच्या दोन्ही बाजूला बटाट्याचे मिश्रण लावा.
- दुसरीकडे गव्हाच्या पीठामध्ये रवा, हळद, लाल तिखट, मीठ आणि थोडं पाणी घालून त्याचे मिश्रण करा.
- आता या मिश्रणामध्ये ब्रेड बटाटा स्लाईस घालून हे गरम तेलामध्ये फ्राय करुन घ्या.
- 7-8 मिनिट लालसर होईपर्यंत ब्रेड बटाटा स्लाईस तळून घ्या.
- तयार नाश्ता टोमॅटो सॉससोबत सर्वांना सर्व्ह करा.
हेही वाचा :
Rava Pizza : मुलांना मैदा नाही तर खावू घाला रवा Pizza
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -