कोलेस्ट्रॉलला पूर्णपणे चुकीचे म्हणता येणार नाही. आपल्या शरीरात काही नव्या कोशिका आणि महत्त्वाचे हार्मोन्स तयार होण्यााठी कोलेस्ट्रॉल अत्यंत गरजेचे असते. मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिरेक आपल्यासाठी धोकादायक ठरतो. असेच काहीसे कोलेस्ट्रॉलचे सुद्धा आहे. शरीरात कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढला गेला तर तो आपल्या धमन्यांमध्ये जमा होऊ लागतो. या स्थतिला हाय-कोलेस्ट्रॉल असे म्हटले जाते. यामुळे काही आजारांचा सामना करावा लागतो. ऐवढेच नव्हे तर हृदयापर्यंतचा रक्तपुरवठा ब्लॉक होऊ शकतो. परिणामी हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढला जातो.
लाइफस्टाइलमध्ये होणाऱ्या बदलावांमुळे हाय कोलेस्ट्रॉलची समस्या वाढली जाते. अशातच गरजेचे आहे की, आपण एक हेल्दी लाइफस्टाइल फॉलो केली पाहिजे. आज आपण अशा काही गोष्टी पाहणार आहोत ज्या खाल्ल्याने शरीरात हाय-कोलेस्ट्रलॉचा स्तर नियंत्रित राहतो.
ओटमील आणि ओट्स
यामध्ये सॉल्यूबल फायबर असते. जे बॅड कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यास मदत करतो. कोलेस्ट्रॉलला रक्तात मिक्स होण्यापासून रोखण्यासाठी सॉल्युबल फाइबर याला डाइजेस्टिव्ह ट्रॅक्टला बांधून ठेवतो.
फॅटी फिश
साल्मन, टूना आणि मॅकेरल मध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड असते. ओमेगा-3 फॅटी अॅसिड बॅड कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करत गुड कोलेस्ट्रॉला स्तर वाढवते.
नट्स
बदाम, आक्रोड आणि शेंगदाण्यात प्रोटीन, डाएट्री फायबर आणि हेल्दी फॅट्स असतात. नट्सचे सेवन केल्याने गुड कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढला जातो. त्याचसोबत बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतो.
डाळी
बीन्स आणि डळींमध्ये सॉल्युबल फायबर आणि प्रोटीनचा उत्तम स्रोत असतो. तो ब्लड शुगरचा स्तर सुधारणे आणि बॅड कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यास मदत करतो.
फळं आणि भाज्या
फळं आणि भाज्यांमध्ये फायबर अधिक प्रमाणात असते. त्याचसोबत यामध्ये कॅलरीज आणि फॅट कमी प्रमाणात असते. विविध फळांचे सेवन केल्याने बॅड कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होतो आणि गुड कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रित ठेवला जातो.
हेही वाचा- मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण आहे आवळा