Good Health Care Tips: ‘या’ फुलांच्या सेवनामुळे होऊ शकतात अनेक आजार दूर

Good Health Care Tips 4 Amazing Health Benefits of Flowers
Good Health Care Tips: 'या' फुलांच्या सेवनामुळे होऊ शकतात अनेक आजार दूर

फुलांचा जास्त करून वापर पूजा, सण आणि सजावटीसाठी केला जातो. परंतु फुलांमध्ये कॅरोटीनोइड्स, फ्लेव्होनॉइड्स आणि फ्लेव्होनॉल्स हे अधिक प्रमाणात असतात हे तुम्हाला माहित आहे का? याशिवाय फुलांमध्ये प्रोटीन, कॅरटीन, तेल, व्हिटॅमिन आणि सॅकराइड्ससारखे पोषक तत्त्व असतात. हे सर्व काही पालेभाज्यांमध्येही आढळते. पण तुम्ही निरोगीदायी राहू इच्छित असाल तर फुलांचे सेवन करू शकतात. जाणून घ्या कोणत्या कोण-कोणत्या फुलांचे सेवन तुम्ही करू शकतात.

जास्वंद (Hibiscus) – पचनासंबंधित समस्या आणि महिलांमधील प्रजनन समस्येवर जास्वंद खूप चांगले काम करते. याशिवाय जास्वंदचा मधुमेह आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी वापर केला जातो. या फुलामध्ये अँटी ऑक्सिडंटची गुणं असतात. या गुणांमुळे अनेक समस्या दूर होतात.

लॅव्हेंडर (Lavender) – या फुलाचे सेवन केल्यामुळे नर्व्हस सिस्टम रिलॅक्स करण्यास मदत होते. जर तुम्ही दररोज या फुलाचे सेवन करत असाल तर अनेक प्रकारचे संक्रमण आणि स्नायू क्रॅम्पची समस्या दूर होईल. तसेच हे फुल केसांसाठी खूप फायदेशीर असल्याचे म्हटले जाते.

गुलाब (Rose) – गुलाबमध्ये खूप ऑक्सिडंट गुणं असतात. तसेच गुलाब व्हिटॅमिन्सचा एक उत्तम स्रोत आहे. याचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो.

झेंडू (Marigold) – आपण नेहमी पाहतो की, झेंडूच्या फुलांचा वापर जास्तीत जास्त पूजेसाठी केला जातो. त्याच बरोबर सजावटीसाठीही केला जातो. परंतु यात अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत जे तुमच्या पोटाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी खूप उपयुक्त असतात.


हेही वाचा – Dengue: डेंग्यूची लागण झाल्यास करा ‘या’ पदार्थांचे सेवन