Saturday, November 30, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीHealth Tips : डोक्यावर पांघरूण घेऊन झोपणे चांगले की वाईट?

Health Tips : डोक्यावर पांघरूण घेऊन झोपणे चांगले की वाईट?

Subscribe

थंडीची लाट आता देशात वाढू लागली आहे. त्यामुळे कपाटात ठेवलेले ब्लॅकेट्स, चादरी आता बाहेर येऊ लागलेत. थंडीच्या दिवसात रात्री झोपताना ब्लॅकेट्स, चादरीमध्ये गुंडाळून घेऊन मस्त ताणून दिल्याचे सुख काही वेगळचं असते. झोपताना प्रत्येकाची पांघरूण घेऊन झोपण्याची पद्धत वेगळी असते. काहींना कडाक्याच्या थंडीतही अंगावर नको असते तर काहींना डोक्यावर पांघरूण घेण्याची सवय असते. या व्यक्तींना डोक्यावर पांघरूण घेतल्याशिवाय झोप लागत नाही. अगदी डोक्याच्या केसांपासून ते पायांच्या नखांपर्यत संपूर्ण शरीर झाकून झोपण्यात येते. पण, ही सवय आरोग्यासाठी चांगले की वाईट? या प्रश्नाचे उत्तर अनेक जणांना ठाऊक नसते.

खरं तर, डोक्यावर पांघरूण घेऊन झोपल्याने शारीरिक व्याधी सुरू होण्याची शक्यता असते. यात डिमेंशिया, अल्झायमर, हृदयाशी संबधित आजार होऊ शकतात.

- Advertisement -

जेव्हा तुम्ही रात्रभर डोक्यावर पांघरूण घेऊन झोपता तेव्हा शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. परिणामी, शरीरातील उष्णता वाढते. शरीरातील उष्णता वाढल्याने थकवा आणि डोकेदुखीची समस्या सुरू होते.

अनेक संशोधनानुसार, डोक्यावर पांघरूण घेऊन झोपल्याने मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. तुम्हाला जर सतत डिप्रेशन, ताणतणावाच्या समस्या जाणवत असतील तर काही दिवस पांघरूण घेऊन झोपू नका. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.

- Advertisement -

डोक्यावर पांघरूण घेऊन झोपल्याने श्वसनाशी संबंधित समस्या सुरू होतात. अनेकांना स्लीप एपनियाचा त्रास असतो. अशा व्यक्तींसाठी तर डोक्यावर पांघरूण घेऊन झोपण्याची सवय अत्यंत घातक ठरू शकते. त्यामुळे ज्या व्यक्तींना स्लीप एपनियाचा त्रास आहे, अशांनी तर चुकूनही डोक्यावर पांघरूण घेऊन झोपू नये.

डोक्यावर पांघरूण घेऊन झोपण्याची सवय हृदयाशी संबंधित समस्यांना आमंत्रण देणारी ठरू शकते. जेव्हा आपण डोक्यावर पांघरूण घेऊन झोपतो तेव्हा ऑक्सिजनच्या प्रवाहावर परिणाम होतो. तुम्हाला गुदमरल्यासारखे वाटू शकते. अशावेळी तुम्हाला जर दमासारख्या तक्रारी असतील तर हे हृदयाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. काही प्रकरणांमध्ये हृदयविकाराचा झटका आला असल्याचे समोर आले आहे.

 

 

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

- Advertisment -

Manini