Eco friendly bappa Competition
घर लाईफस्टाईल 'चांद्रयान' 3 मोहिम यशस्वी झाल्या बद्दल Googleचे खास डूडल

‘चांद्रयान’ 3 मोहिम यशस्वी झाल्या बद्दल Googleचे खास डूडल

Subscribe

जगभरात प्रसिद्ध असणारे search engine optimization म्हणजेच गूगल हे अत्यंत फास्ट इंजिन म्हणून ओळखले जाते. अशातच Google Doodle कायमच खास काहीतरी करत असतात. आणि आजही स्पेशन दिवसानिमित्त एक खास गुगल डूडल गुगलने शेअर केलं असून भारताची चांद्रयान ३ मोहिम यशस्वी ठरल्या निमित्त हे खास गुगल डूडल गुगलने तयार केलं आहे. Google नेहमीच काहीतरी विशेष घडल्यावर त्याचे डूडल बनवते. आणि नुकतंच गुगलने त्यावर ब्लू मूनचा डूडल बनवला आहे. तसेच हा Google doodle सगळ्यांना आकर्षित करतोय. अशातच आता जाणून घेऊया काय आहे या गूगल डूडलचे महत्व.

What is Google? - Tech Monitor

- Advertisement -

भारतीय यान यशस्वीपणे चंद्रावर उतरवण्याचा महत्त्वाचा टप्पा काल संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी पार पडला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा भारत पहिला देश ठरला. चांद्रयानाचं लँडिंग यशस्वी होणारच असा ठाम विश्वास भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) व्यक्त केला होता तो अखेर खरा करुन दाखवला आहे.

काय आहे आजचं Google Doodle?

आजच्या गुगल डूडलमध्ये Google मधील o हा चंद्र असल्याचा दाखवलं गेलं आहे. त्यानंतर या चंद्राभोवती भारताचं विक्रम लँडर फिरत असतं आणि अखेर ते दक्षिण ध्रुवावर उतरतं, त्यानंतर चंद्रही आनंदी झाल्याचं दिसून आलं असून अखेरीस आनंदी पृथ्वीही दिसून येते. हे अॅनिमेटेड गुगल डूडल फारच सुंदर दिसत असून त्यावर क्लिक करताच भारताच्या Chandrayaan 3 मोहिमेची सर्व माहिती आणि बातम्या दिसून येत आहेत.

- Advertisement -

Want to watch Chandrayaan-3 launch LIVE on July 14? Here's your chance | Mint

Chandrayaan 3 मोहिम अखेर यशस्वी ठरली आणि भारतानं अखेर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवण्याचा खास मान पटकावला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला असून ही मोहिम फत्ते होताच देशभरात अगदी उत्सवाचं वातावरण होतं. सर्व कार्यालयांपासून सार्वजनिक ठिकाणी, कॉलेज, महाविद्यालयांमध्ये आनंद आणि जल्लोष साजरा केला गेला. भारताच्या या खास कामगिरीचं कौतुक गुगलनं देखील केलं असून एक खास गुगल डूडल आज ठेवलं आहे.

इस्त्रोनं सतीश धवन प्रक्षेपण केंद्र श्रीहरी कोटा येथून १४ जुलै रोजी चांद्रयान ३ चे प्रक्षेपण केलं होतं. त्यानंतर २३ ऑगस्टपर्यंत प्रत्येक पातळीवर भारताला यश मिळालं होतं. यावेळी भारतानं ऑर्बिटर न पाठवता प्रॉपल्शन मॉड्यूल पाठवलं होतं. त्यामध्ये देखील अपेक्षेपेक्षा जास्त इंधन शिल्लक राहिले. या इंधनाचा उपयोग करून हे मॉड्यूल चंद्राभोवती पुढील किमान सहा महिने फिरत राहून पृथ्वीचा अभ्यास करेल.

अशाप्रकारे गूगल डुगल त्याच्या विशेष दिवशी आपली सेवा देत असतो. तसेच Google हे नाव प्रत्येक खास दिवशी बदलण्यात येते. यामागे अनेक रंजक गोष्टी या निमित्याने वाचायला मिळतात. विशेष म्हणजे या google वरची माहिती ही झटपट आपल्या पर्यंत पोहचते आणि प्रत्येक गोष्टीची माहिती सहज उपलब्ध होते.


हेही वाचा : Chandrayaan-3 मध्ये ‘या’ महिलांची होती महत्त्वाची भुमिका

 

- Advertisment -