लेखिका अमृता प्रीतम यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त गुगलची खास आदरांजली!

पंजाबी कवयित्री, साहित्यिक असलेल्या अमृता यांनी सर्वच भाषांवर आपली छाप

गुगल डूडलने आजचा दिवस ज्येष्ठ लेखिका अमृता प्रीतम यांना समर्पित केले आहे. गुगलने आजचे डूडल अमृता प्रीतम यांच्या १००व्या जयंतीनिमित्त त्यांच्या नावाने तयार केले आहे. या गुगल डूडलला वेगळ्याच अंदाजात तयार केले आहे.
भारतीय साहित्यातील प्रसिद्ध आणि नावाजलेले नाव म्हणजे अमृता प्रीतम. अष्टपैलू कवयित्री, लेखिका अमृता प्रीतम यांची आज १००वी जयंती.

पंजाबी कवयित्री, साहित्यिक असलेल्या अमृता यांनी सर्वच भाषांवर आपला ठसा उमटवला. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कारही मिळाला होता. हळव्या मनाच्या असलेल्या अमृता या बंडखोरसुद्धा होत्या. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात गुजरांवाला शहरात ३१ ऑगस्ट १९१९ ला अमृता प्रीतम यांचा जन्म झाला. त्यांचा बालविवाह झाला होता. भारतीय साहित्यविश्वाचा विचार केल्यास या साहित्यविश्वाला खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक उंचीवर नेण्याचं कार्य कोणी केलं असेल तर ते अमृता प्रीतम यांनी.

वैयक्तिक जीवन

अमृता प्रीतम यांचे लग्नापूर्वीचं नाव ‘अमृता कौर’ असं होतं, विवाहानंतर त्या अमृत प्रीतम झाल्या. त्यांचा विवाह सुमारे पंधरा वर्षे टिकला. विवाहविच्छेद झाला तरी त्यानंतरही त्या अमृता प्रीतम म्हणूनच ओळखल्या गेल्या. याच्या १६व्या वर्षीच त्यांच्यापेक्षा जास्त वय असलेल्या प्रीतमसिंहांशी त्यांचे लग्न झाले. दरम्यान, त्यांचे साहीर लुधियानवी यांच्यावर प्रेम होते. मात्र, याचवेळी चित्रकार इमरोज यांच्याशी भेट झाली. त्यांच्यासोबत नात्याला कोणतेही नाव न देता ४० वर्ष आयुष्य घालवले. लाहोरमध्ये लहानाची मोठी झालेल्या अमृता यांचे शिक्षणही तिथेच झाले. त्यांचे आत्मचरित्र ‘रसीदी टिकट’ खूप प्रसिद्ध झाले होते, त्यांच्या अनेक पुस्तकांचा इतर भाषांमध्ये अनुवाद देखील झाला.

प्रेमजाणिवेने व्यापलेल्या त्यांच्या कविता 

अमृता प्रीतम यांच्या अनेक कविता प्रेमजाणिवेने व्यापलेल्या होत्या. त्यांनी त्यांच्या जीवनात त्यांनी जे अनुभवले त्यांनी तेच कवितांच्या माध्यमातून त्यांनी मांडले. ‘मेरा शहर’, ‘मैं जनता’, ‘घोर काली घटा’, ‘राजनीती’ यासारख्या त्यांच्या कविता सामाजिक कविता राजकरणावर, व्यवस्थेवर प्रखर, आक्रमक, उपहासात्मक शब्दात लिहिलेल्या होत्या.

ज्ञानपीठ पुरस्कारासह पद्मविभूषण पुरस्कारानं गौरव

अवघ्या सोळाव्या वर्षीच त्यांनी पहिला कवितासंग्रह प्रकाशित केला होता. २० व्या शतकातील कवयित्री म्हणून अमृता या साहित्य अकादमीचा पुरस्कार पटकावणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. त्यांनी १०० हून अधिक पुस्तके लिहली. यामध्ये चरित्र, कविता, पंजाबी लोकगीते याशिवाय इतर भाषांमधीलही आत्मचरित्रे लिहली. ज्ञानपीठ पुरस्कारासह त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आले होते.