भगवान कृष्णाचा जन्मोत्सव म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण फार मोठ्या आनंदात देशभरात साजरा केला जातो. यावेळी गोडाधोडाचे पदार्थ आवर्जुन केले जातात. त्यापैकीच एक म्हणजे दही काला. याचीच आज आपण रेसिपी पाहणार आहोत. चला तर पाहूयात रेसिपीसाठी लागणे साहित्य आणि कृती.
साहित्य-
1 वाटी पोहे
दही
कढीपत्त्याची 4-5 पाने
मीठ
साखर
1 बारीक कापलेली काकडी
किसलेला ओला नारळ
तडक्यासाठी जीर, मिर्ची
शेंगदाणे
डाळिंबाचे दाणे
तूप/ तेल
कृती-
दही काल्याची रेसिपी तयार करण्यासाठी सर्वात प्रथम पोहे धुवून घ्या. त्यानंतर एका भांड्यात ते पोहे घेऊन त्यात बारीक कापलेली काकडी, किसलेला ओला नारळ, डाळिंबाचे दाणे, दही, मीठ आणि साखर टाका.
असे केल्यानंतर मध्यम आचेवर तडका तयार करण्यासाठी त्यात तूप किंवा तेल टाका. आता त्यात जीरे, कढीपत्ता, शेंगदाणे आणि कापलेल्या मिर्च्या टाका. हे व्यवस्थितीत भाजू द्या. भाजल्यानंतर हा तडका पोह्यावर टाका आणि ते सर्व व्यवस्थितीत मिक्स करा. अशा प्रकारे तयार होईल गोपाळकालासाठी स्पेशल दही काला.
हेही वाचा- गोकुळाष्टमीला कृष्णासाठी बनवा पंजिरी