बदलत्या ऋतूंसोबत फॅशन ट्रेंडमध्येही खूप बदल होत असतात. याच कारणामुळे प्रत्येकाला स्वतःसाठी वेगवेगळ्या डिझाइनचे कपडे खरेदी करायला आवडतात. काही लोकांना एथनिक , ट्रेडिशनल पोशाख घालायला आवडते, तर काहींना पाश्चात्य पोशाख घालायला आवडतात. पण जर तुम्हाला कपडे पुन्हा वापरायचे असतील तर तुमच्या कलेक्शनमध्ये असे डिझाइन केलेले सूट निवडा जे तुमचा लूक वाढवतील. सोबतच कोणत्याही खास प्रसंगांसाठी तुम्हाला हे परिधान करता येतील. यासाठी तुम्ही गोटा पट्टी सूट्सचा नक्कीच विचार करू शकता. पाहूयात गोटा पट्टी वर्कच्या काही खास आणि लेटेस्ट डिझाइन्स.
गोटा पट्टी शरारा सूट
जर तुम्हाला सुंदर दिसायचे असेल तर तुम्ही गोटा पट्टी शरारा सूट परिधान करू शकता. या प्रकारचा सूट घातल्यानंतर तो चांगला दिसेल. तसेच, यामुळे तुमचा लूक आकर्षक होईल. या प्रकारच्या सूटमध्ये तुम्हाला फक्त बॉर्डरवर गोटा वर्क डिझाइन मिळेल. याशिवाय, संपूर्ण सूट प्लेन किंवा प्रिंटेड डिझाइनमध्ये देखील तुम्हाला उपलब्ध होऊ शकतो. या प्रकारचा सूट घालून तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात जाऊ शकता. हे सूट्स तुम्हाला बाजारात 1000 ते 2000 रूपयांपर्यंत मिळू शकतील.
गोटा पट्टी सलवार सूट
जर तुम्हाला सलवार सूट घालायला आवडत असेल तर तुम्ही गोटा पट्टी सलवार सूट घालू शकता . या प्रकारात तुम्हाला सूटच्या नेकलाइनवर गोटा वर्क केलेले मिळेल. याशिवाय, दुपट्ट्यावर गोटा वर्क डिझाइन उपलब्ध असेल. तुम्ही कौटुंबिक कार्यक्रमात कधीही या प्रकारचा सूट घालू शकता. यामुळे तुम्ही छान दिसाल. तसेच, तुम्हाला कोणताही नवीन सूट वेगळा शोधण्याची आवश्यकता नाही.
गोटा वर्क असलेला अनारकली सूट
जर तुम्हाला फ्लेयर्ड सूट घालायला आवडत असेल तर तुम्ही गोटा वर्कचा अनारकली सूट घालू शकता. या प्रकारचे सूट घातल्यानंतर अतिशय छान दिसतात व रिच लूकही देतात. यामध्ये, सूटच्या खालच्या भागात गोटा वर्क डिझाइन आढळते. याशिवाय, बाही आणि दुपट्ट्यावरही गोटा वर्क उपलब्ध असते. यामुळे लूक सुंदर होतो.
हेही वाचा : Parenting Tips : मुलांचा दिवस हॅप्पी आणि स्ट्रेस फ्री ठेवण्यासाठी टिप्स
Edited By – Tanvi Gundaye