मार्केटमध्ये थंडीच्या दिवसात हिरवा वाटाणा खुप येतो. पण फ्रोजेन आणि ड्राय फॉर्ममध्ये ते तुम्हाला वर्षभर मिळतील. मात्र फ्रोजन वाटाणे खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे ताजा हिरवा वाटाणा म्हणजेच मटर खाण्याचा सल्ला दिला जातो. थंडीत हिरवा वाटाणा खाण्याचे नक्की काय फायदे होतात हे जाणून घेऊयात.
हिरवा वाटाणा खाण्याचे फायदे
-प्रोटीनचा उत्तम स्रोत
हरिवा वाटाण्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. त्यामुळे ते दररोज खाल्ल्याने हाड आणि स्नायू मजबूत होतात. त्याचसोबत मसल्स रिपेयर करण्यासही मदत होते. मुलांच्या शरीराच्या विकासासाठी हे फार फायदेशीर ठरू शकते.
-वाटण्यात भरपूर फायबर असते
हिरव्या वाटाण्यात फायबर भरपूर प्रमाणात असते. ते खाल्ल्याने खुप वेळ पोट भरल्यासारखे राहते. अशातच तुम्ही अतिरिक्त जेवण खाण्यापासून दूर राहता. हळूहळू वजन कमी करू लागते. ज्या लोकांना वजन कमी करायचे असते त्यांनी आपल्या डाएटमध्ये याचा जरुर समावेश केला पाहिजे.
-मधुमेहासाठी फायदेशीर
हिरव्या वाटण्यात ग्लाइसिमिक इंडेक्स फार कमी असते. त्यामुळे ब्लड शुगरचा स्तर रेग्युलेट होण्यास मदत होते. त्याचसोबत अचानक शरीरात वाढणारी शुगर यामुळे कंट्रोल होते. फायबर असल्याने कार्बोहाइड्रेटचे एब्जॉर्ब्शन कमी होते. हेच कारण आहे ती, मधुमेहासाठी हिरवा वाटाणा फायदेशीर ठरतो.
-हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
हिरव्या वाटाण्यात असे काही मिनिरल्स असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशिअम आणि कॅल्शिअम ही असतात. ही सर्व पोषक तत्त्वे ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका फार कमी होतो.
हेही वाचा- रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायल्याने होऊ शकते नुकसान…