घरताज्या घडामोडीgreen peas-हिरव्या वाटाण्याचे अतिसेवन म्हणजे आजाराला आमंत्रण

green peas-हिरव्या वाटाण्याचे अतिसेवन म्हणजे आजाराला आमंत्रण

Subscribe

हिवाळा सुरू झाला असून या सिझनमध्ये ज्या फळभाज्या बाजारात मुबलक प्रमाणात येतात त्यात हिरवा वाटाणा हा सर्वांनाच प्रिय असतो. गोड तुरट चवीमुळे हिरव्या वाटाण्यापासून वेगवेगळ्या डिशेसही बनवता येतात. थंडीत घराघरांमध्ये उसळीपासून ते भातापर्यंत हिरवा वाटाणा वापरला जातो. हिरव्या वाटाणा खाण्याचे अनेक फायदेही आहेत तसेच तोटेही आहेत.

हिरवा वाटाणा हा प्रोटीनचा मुख्य स्त्रोत म्हणून ओळखला जातो. यात फायबर, अँटीऑक्सिडेंट आणि अनेक पोषक तत्वे असतात. हिरव्या वाटाण्यात व्हिटामीन A, E, D आणि C मुबलक प्रमाणात असेत ज्याची शरीराला गरज असते. हिरवा वाटाण्याच्या सेवनामुळे कोलॅस्ट्रॉलच नाही तर रक्तातील साखरही नियंत्रणात राहते. यामुळे अनेक व्याधींपासून बचावही होतो. पण जसे एखाद्या पदार्थाच्या अतिसेवनाचे दुष्पिरणाम असतात तसेच हिरव्या वाटाण्याचेही आहेत.

- Advertisement -

व्हिटामीन Kचे प्रमाण वाढणे
वाटाण्यात असलेले व्हिटीमीन K कॅन्सरच्या पेशींची वाढ थांबवते. पण जर व्हिटामीन K प्रमाणाबाहेर वाढले तर शरीरावर त्याचे दुष्परिणाम होऊ लागतात. रक्त पातळ होते त्याचबरोबर प्लेटलेट्सही कमी होतात. त्यामुळे जखम भरण्यास वेळ लागतो. यामुळे ज्यांना पोटाशी संबंधित व्याधी असतील अशा व्यक्तींनी वाटाणा खाणे टाळलेले बरे. थ्रोम्बोफ्लिबिटिस आणि गठियाचा त्रास असलेल्या रग्णांनीदेखील वाटाण्याचे सेवन प्रमाणात करावे.

सांधेदुखी
हिरव्या वाटाण्यात मुबलक प्रमाणात प्रोटीन्स, अमिनो अॅसिड आणि जास्त प्रमाणात फायबर असते. यात व्हिटामीन D ही असून हाडे मजबूत करण्याचे काम करते. पण गरजेपेक्षा जास्त वाटाणा खाण्यात आल्यास कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. युरिक अॅसिड वाढते. हे युरिक अॅसिड सांध्यामध्ये जमा झाल्याने सांधेदुखीचा त्रास सुरू होतो.

- Advertisement -

रोगप्रतिकारकशक्ती कमी होते

वाटाण्यातील फायटीक अॅसिड आणि लेक्टीन इतर घटकांच्या प्रक्रियेत बाधा आणतात. त्यामुळे पचनसंस्थेच्या कामात अडथळा निर्माण होतो. यामुळे व्हिटामीन्सचे प्रमाण घटते. यामुळे रोगप्रतिकारकशक्तीही मंदावते.

वजन कमी- जास्त होते
हिरवा वाटाण्यामुळे वजनही वाढते. प्रोटीनचे प्रमाण जास्त असल्याने वाटाण्याच्या अतिसेवनामुळे वजन वाढते. वाटाण्यात भरपूर फायबरही असते यामुळे जर ते प्रमाणात खाल्ले तर वजनही कमी होण्यास मदत होते.

पोटाला सूज , गॅसचा त्रास

वाटाण्याच्या अतिसेवनामुळे पोटाला सूज येते. पोटात गॅस तयार होते. वाटाण्यात जास्त कार्बोहायड्रेट असते. यामुळे त्याच्या अतिसेवनामुळे पचनसंस्थेवर ताण पडतो. तसेच यातील साखरही लवकर पचत नाही. वाटाण्यातील लेक्टीनमुळे पोटाला सूज येते. पोटाशी संबंधीत व्याधी बळावतात.

डायरिया, अतिसार

वाटाण्यात प्रोटीन असतात. अतिरक्त प्रोटीन्स पोटात गेल्यावर तुटतात. यामुळे पचनसंस्थेवर ताण पडतो. यामुळे पोटदुखी, उलटी , जुलाबासारखा त्रास होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -