चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पोटाच्या तक्रारी जाणवणे ही सामान्य बाब झाली आहे. पोटात गॅस होणे, बद्धकोष्ठता, पोट फुगणे, अपचन, ऍसिडिटी या तक्रारी आता रोजच्या रूटीनसारख्या झाल्या आहेत. सकाळी अनेकजणांना पोट साफ न होणे ही रोजची डोकेदुखी झाली आहे, ज्यामुळे संपूर्ण दिवसावर याचा परिणाम होत आहे. अशावेळी पोटाचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी किंवा पोट साफ होण्यासाठी आतड्यांचे आरोग्य राखणे आवश्यक आहे. आतड्या निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला काही घरगुती ड्रिंक्स उपयुक्त ठरतील. चला तर मग जाणून घेऊयात, तुम्ही कोणत्या ड्रिंक्स प्यायला हव्यात,
मीठाचे पाणी –
पोट साफ होत नसेल तर तुम्ही मीठाचे पाणी प्यायला हवे. मीठाचे पाणी प्यायल्यावर पोट साफ होण्यास मदत मिळते. यामुळे पचनात अडथळा ठरणारे विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात आणि पोट साफ होते.
ऍपल सायडर व्हिनेगर आणि मध –
ऍपल सायडर व्हिनेगर आणि मधामध्ये प्रोबायोटिक्स संयुगे असतात, ज्यामुळे आतड्यांवर सकारात्मक परिणाम होतो आणि आतडे निरोगी राहतात. परिणामी, वेळते शौचालय होण्यास सुरूवात होते.
मसालेदार लिंबूपाणी –
मसालेदार लिंबूपाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते. तुम्हाला वारंवार पोटाच्या तक्रारी जाणवत असतील तर काही दिवस मसालेदार लिंबूपाणी प्यायला हवे.
आल्याचा चहा –
पोट निरोगी राहण्यासाठी जेवणाच्याआधी गरम आल्याचा चहा प्यायला हवा. आल्याचा चहा प्यायल्याने जळजळ, पोटदुखी, अपचन सारख्या समस्या उद्भवत नाही.
गवती चहा –
गवती चहा प्यायल्याने पचनसंस्था सुरळीत काम करू लागते. ज्यामुळे पोट फूगणे, ऍसिडिटी, अपचन, बद्धकोष्ठतेसारख्या तक्रारी जाणवत नाही. गवती चहामध्ये असल्याने सिंट्रेक संयुग असते, जो दाहकविरोधी गुणधर्माने परिपूर्ण असतो. ज्यामुळे पोटात गॅस निर्माण होत नाही.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde